Adipurush Trailer : ‘ये कहानी है रामायण की’; आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 09T152053.850

Adipurush Official Trailer : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत (Director Om Raut) यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे.

हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. त्यानंतर आता चाहत्यांसाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जात असल्याचे देखील दिसून आले आहे.

राम आणि लक्ष्मण शबरीने दिलेली उष्टी बोरे खाताना दिसत आहेत. तसेच लक्ष्मणाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्यापासून ते राम-लक्ष्मण वानरसेनेसह रामसेतूवरून लंकेला जाताना सर्व गोष्टींची झलक यामध्ये दाखवण्यात आली आहे. या ट्रेलरचा सर्वात शेवटी रावणाची झलक दाखवण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Om Raut (@omraut)


या सिनेमावर झालेल्या टीकेनंतर या सिनेमाच्या व्हीएफएक्समध्ये बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. या सिनेमातील रावणाचा लुक बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.

‘मैं अटल हूँ’ सिनेमाचे शूटिंग सुरु, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता असणार मुख्य भूमिकेत

गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. पण या सिनेमाचा टीझर बघून यामध्ये दाखवल्या गेलेल्या दृश्यांमुळे या सिनेमावर टीका केली गेली आहे. या टीकेनंतर या सिनेमाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता हा सिनेमा १६ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us