Download App

Sushma Andhare : यांचं छत्रपती शिवाजी महाराजांना भावनिक पत्र

मुंबई : शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागानं महोत्सवाचे आयोजन केलं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक पत्र लिहित विरोधकांवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. तर फितुरांच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला जात असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

Twitter Blue Tick : शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिकही गेलं

सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय की,

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,
आम्हाला माफ करा…
आज तुमच्या जन्मदिनी,
स्वतःला मावळा म्हणणाऱ्या ढोंगी कावळ्याच्या हस्ते, वाद्याचं कातडं पांघरलेल्या धूर्त लांडग्यांच्या हस्ते, शिवसैनिक नाव लावणाऱ्या फितुराच्या हस्ते, किल्ले शिवनेरीवर तुमचा गौरव केला जातोय..

तुमच्या हयातीत गद्दार ताठ मानेने फिरतोय,
असे कधीही घडले नाही…
पण ह्यापुढे पुन्हा कधी असा अधर्म घडणार नाही,
असे वचन आम्ही तुम्हाला देतो..

शिवश्रध्दा आणि शिवनिष्ठा मनी आहेच,
फक्त ह्या गनिमांशी लढण्याचे बळ द्या!
स्वराज्य पुन्हा स्थापन करण्याची ऊर्जा द्या!
आणि ह्या अधर्मयुध्दात विजयी होण्याचा आशीर्वाद द्या!

हर हर महादेव !!
तुमचा खरा मावळा,
सच्चा शिवसैनिक.

अशा आशयाचं भावनिक पत्र शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलंय.

Tags

follow us