मुंबई : उद्धव ठाकरे हे इतिहासाताच रमतात. त्यातून ते बाहेर पडत नाहीत. कधी तरी वास्तवात या, असा हल्लाबोल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (दि. 3) मनसे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना केला होता. त्यांच्या या टीकेला आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाघीणीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, ठाकरेंच्या वाघीणीने प्रत्युत्तर देताना त्यांची जीभ घसरल्याने त्यांच्या या टीकेनंतर ठाकरे गट आणि मनसेमध्ये शाब्दिक वाद वाढून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंवर वर्मी घाव घालणारी ही वाघीण दुसरी तिसरी व्यक्ती कुणी नसून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. (Sushma Andhare On Raj Thackeray)
Video : लाडक्या बहीणींनो 1500 रूपये कचकून घ्या: शिंदे-फडणवीस फक्त पोस्टमन; अंधारे बरसल्या
प्रत्त्युत्तर देताना काय म्हणाल्या अंधारे?
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात. आणि जेव्हा त्यांना अनुकूल ऋतू येतो, तेव्हा ते बाहेर पडतात. त्यांची उपजीविका आणि इतर काही गोष्टी शोधतात. राजकारणात सुद्धा असे काही राजकीय सस्तन प्राणी आहेत. जे चार साडेचार वर्षे एका कोषामध्ये जातात आणि निवडणुकांचा हंगाम आला की ते बाहेर पडतात. बाहेर पडून आपण वेगळ्याचं ध्रुवावरून आलेलो आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशांपैकी एक म्हणजे राज ठाकरे साहेब असे अंधारे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे हे निवडणुका आल्या म्हणून बोलत आहेत. निवडणुका झाल्यावर पुढचे साडेचार वर्ष ते शीतनिद्रेत जाणार आहेत, असा टोला लगावतनाच राज साहेब, गेट वेल सून. मला तुमची काळजी वाटतेय असा चिमटाही अंधारे यांनी राज ठाकरेंना काढला आहे.
Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!
राज ठाकरेंनी काय केली होती टीका?
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राज यांनी उद्धव ठाकरे हे इतिहासातून बाहेरच येत नाही. सारखी वाघनखं काढतो, इथून अब्दाली आला, तिथून अफजलाखान आला, तिकडून शाहिस्तेखान आला, अरे कधी तरी वास्तवात या आणि महाराष्ट्राबद्दल बोला अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. राज यांच्या या टीकेला अंधारेंनी वर्मी घालणारा घाव घालत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, अंधारे यांनी प्रत्तुत्तर देताना राज ठाकरेंना राजकीय सस्तन प्राणी असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आगामी काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, मनसेकडून सुषमा अंधारेंना (Sushma Andhare) काय प्रतिक्रिया दिली जात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.