मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जेव्हा मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. तेव्हा कायदेशीर चौकशी चालू झाल्यावर तेव्हा त्यांनी स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. कारण चौकशी निष्पक्ष व्हावी ही त्या मागची त्यांची भावना होती. आता विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देणे आणि ब्लॅकमेल करणे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या संदर्भात अनिल देसाई यांनी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते.
Ram Shinde Vs Rohit Pawar : बारामती ॲग्रोच्या संचालकांवर गुन्हा दाखल!
सुषमा अंधारे म्हणतात, आता जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्याच संदर्भाने काही मोठे खुलासे होत असतील आणि संबंधित केसची चौकशी चालू असेल तर नैतिकता म्हणून गृहमंत्री पदाच्या जबाबदारीतून देवेंद्र फडणवीस यांनी मुक्त होणे हे केव्हाही चांगले आहे. कारण ते स्वतःच जर गृहमंत्री पदावर कार्यरत असतील तर चौकशी निष्पक्ष होईल याची कशी खात्री द्यावी, असा प्रश्न आम्हाला पडत आहे, असे म्हटले आहे.