Download App

सरकारने दोन्ही समाजाला खेळण्याचं पाप…; सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकावर टीका केली. दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करू नये, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

  • Written By: Last Updated:

Sushma Andhare : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेच (Manoj Jarange) आंदोलन सुरू आहे. तर ओबीसी आरक्षणाच्य संरक्षणार्थ लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केलं. त्यामुळं मराठा विरुध्द ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सरकावर टीका केली. दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करू नये, अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

शिंदे-फडणवीसांसमोरच भुजबळांचा पारा चढला, म्हणाले, ‘सयेसोयरेची अधिसूचना काढू नका…’ 

आज सुषमा अंधारेंनी माध्ममांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मराठा आंदोलन असो की ओबीसी आंदोलन… सरकार दोन्ही समाजाला खिळवत ठेवण्याचं काम करत आहे. दोन्ही समाजाला खेळवण्याचं पाप सरकारने करू नये. एकीकडे मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांना मागण्या पूर्ण करू असे आश्वासन देतात, तर दुसरीकडे ओबीसी आंदोलकांनाही मागण्या करणार असल्याचा शब्द सरकार देत आहे. एकाच म्यानात दोन तलवारी कशा असू शकतात? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

‘आंदोलन कसं करावं हे लक्ष्मण हाकेंकडून शिका’, नाव न घेता पंकजा मुंडेंनी लावला जरांगे पाटलांना टोला  

त्या पुढं म्हणाल्या की, सरकारला जर दोन्ही समाजाच्या मागण्या मान्य करायच्या असतील तसेच यावर जर तोडगा तोडगा काढायचा असेल, तर दोन्ही समाजातील आंदोलकांना समोरासमोर बसवावे. एकत्रित बैठक घेऊन समन्वयाने त्यांच्या प्रश्नावर योग्य तोडगा काढला पाहिजे. सरकारचा नियती जर चांगली असेल तर त्यांनी हे जाती-धर्माचं ध्रुवीकरण थांबवायला हवं आणि यावर योग्य तो तोडगा काढायला हवा.

मोट बांधण्याच्या तुम्ही गप्पा मारून नका
दरम्यान, हाके यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. मी दलित आणि मुस्लिम समाजाची मोट बांधणार आहे. त्यानंतर आणखी तीव्रतेने लढाई लढणार आहे, असं जरांगे म्हणाले होते. त्यावर बोलतांना म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मुस्लिमांची मतं चालली, परंतु इम्तियाज जलील चालले नाहीत. दलितांची मत चालतात, पण आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांना स्वीकारले नाही. त्यामुळे दलित आणि मुस्लिमांची मोट बांधण्याच्या तुम्ही गप्पा मारून नका, अशी टीका अंधारेंनी केली.

अशातच आता सरकारने दोन्ही समाजाच्यचा नेत्यांशी समन्वय साधून मार्ग काढावा असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी केलं. त्यामुळं सरकार काय भूमिका घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us

वेब स्टोरीज