Raju Shetty Support Mahavikas Aghadi : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्ष एकमेंकाविरोधात निवडणूक लढवणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे आता स्वाभिमानी पक्षाने मोठा निर्णय घेत महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना पांठीबा देणारे पत्र लिहिले आहे.
या पत्रात खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी लिहिले आहे की, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीची रणधूमाळी सुरु झालेली आहे. सदर निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचार व त्याच्याबरोबरच शहरी भागातील जनतेचे प्रश्नांवर आवाज उठवतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने निवडणुका लढविल्या जात आहेत. सत्ताधारी पक्षांनी विकासाच्या नावाखाली राज्यात भोंगळ व मनमानी कारभार सुरु केला आहे.
गोरगरीब व सामान्य जनता या व्यवस्थेमध्ये भरडली जात आहे. यामुळे स्वाभिमानी पक्ष राज्यामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये (Municipal Corporation Elections) महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठींबा देत आहे असं या पत्रात खासदार राजू शेट्टी यांनी लिहिले आहे.
महापालिका निकालाआधीच कल्याणमध्ये भाजपचा सलग दुसरा विजय; आज होणार घोषणा?
तर या महापालिका निवडणुकीत काँग्रेस मुंबईसह अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे तर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार आहे.
