Download App

तलाठी परीक्षेत 200 पैकी 214 मार्क कसे मिळाले? महसूल विभागाने सांगितलं लॉजिक

  • Written By: Last Updated:

Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या भरतीच्या परीक्षेत 200 गुणांच्या परीक्षेत 48 उमेदवारांना दोनशेहून अधिक गुण मिळाल्याची बाब स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निदर्शनास आणली आहे. त्यामुळे तलाठी भरती (Talathi Bharti) पुन्हा एकदा वादात सापडली असून विरोधकांनी या परीक्षेचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे.

Golden Globe: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सिनेमांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी… 

दरम्यान, यावर आता महसूल विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विद्यार्थ्याला 200 पैकी 214 गुण मिळाल्याचा कुठलाही गैरप्रकार घडला नसून हे केवळ गैरसमजुतीतून घडलंय, असा खुलासा महसूल विभागाने केला.

TCS द्वारे तलाठी भरती परीक्षा घेण्यात आली. ही तलाठी भरती परीक्षा 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी दिली होती. काठीण्य पातळीच्या माध्यमातून समानीकरण करण्याच्या पद्धतीमुळं उमेदवारांचे गुण वाढले आहेत, असं परीक्षा समन्वयकांनी प्रसिध्दी पत्रकात सांगितलं.

Golden Globe: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सिनेमांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी… 

सामान्यीकृत गुण प्रसिध्द करणं महत्वाचं आहे. जेव्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात येईल, त्यावेळी आरक्षण व सारखे गुण मिळालेले अनेक उमेदवारी असतील. अशा उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणं शक्य होते. त्यामुळं नेकक्या गुणांबाबर गोंधळ उडत नाही, असं परीक्षा समन्वयकांनी म्हटलं.

ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली आहे. त्यामुळे काही शिफ्टची परीक्षा सोपी आहे, तर काहींची अवघड आहेत. तर काहींची कमी अधिक प्रमाणात प्रश्नांची काठिण्य पातळी बदलेली असते. त्यामुळं समानीकरण केलं जातं. ही प्रक्रिया अनेक शासकीय परीक्षांमध्ये राबवली जाते. त्यामुळं अवघड पेपर गेलेल्या उमेदवारांना न्याय मिळतो. तसंच, समान गुण असलेल्यांच्या गुणांमध्ये तफावत निर्माण होते, त्यामुळं निवड प्रक्रिया सोपी जाते, असंही त्यांनी म्हटलं.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप काय?
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने काल ट्विटरवर एक पोस्ट करत लिहिलं की, हे दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत. परीक्षेत फक्त 15 दिवसांचे अंतर असेल. वनरक्षकमध्ये 54 गुण, तर तलाठीमध्ये 200 पैकी 214 गुण घेऊन टॉप केलं. हे कसं झालं? तलाठी भरतीत घोटाळा झाला, हे आमचं आधीपासून मत आहे. निकालांतर त्याला दुजोरा मिळाला. त्यामुळं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

follow us