नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती करणार ‘ट्विटर वॉर’; वाचा सविस्तर

नोकरभरतीच्या कठोर कायद्यासाठी स्पर्धा परीक्षा समिती करणार ‘ट्विटर वॉर’; वाचा सविस्तर

राज्यात ७५ हजार पदभरतीची घोषणा सरकारने केली असून विविध पदांच्या जाहिरातीही येत आहेत. मात्र, आतापर्यंतचा अनुभव बघता अशा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळे ठरले आहेत.

प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…

मंत्रालयात बसलेले आयएएस अधिकारी, कर्मचाऱ्यांपासून ते परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे संचालक, दलाल, परीक्षा केंद्र चालक आणि शेकडो उमेदवारांना या घोटाळ्यांमध्ये अटक झाली होती. त्यामुळे अशा घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात परीक्षांमधील गैरप्रकारांसाठी इतर राज्यांप्रमाणे विशेष कायदा करणे आणि परीक्षा केंद्र हे टीसीएसचे स्वत:चे हवेत या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मंगळवार २५ जुलैला सकाळी ११ ते दुपारी १२ वाजातपर्यंत टि्वटर वॉर पुकारला आहे.

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील महापरीक्षा पोर्टल, टीईटी घोटाळा, आरोग्य भरती पेपरफुटी, म्हाडा नोकरभरती पेपरफुटी, मुंबई पोलीस भरती पेपरफुटी आदी नोकर भरती घोटाळे उघड केले आहेत. याचाच भाग म्हणून आता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होऊन टि्वटरच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी या मार्गाने लढा दिला जाणार आहे. यामध्ये हॅश टॅग परीक्षा केंद्र फक्त टीसीएस आणि हॅश टॅग पेपरफुटीवर कडक कायदा अशी मागणी राहणार आहे. यामध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube