प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…

प्रत्येकी किलोभर मटण देऊनही निवडणूक हरलो.., गडकरींनी ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला…

Nitin Gadkari : रोखठोकपणे भूमिका मांडणे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ओळख. अशातच आता गडकरी यांनी आपण एका निवडणुकीत कसं हरलो होतो? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. एक किलो सावजी मटण घरोघरी पोहोचवलं, पण आम्ही त्यावेळी निवडणूक हरलो असल्याचं मंत्री नितीन गडकरी यांनी रंगवूनच सांगितला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची हत्या; पिझ्झा डिलिव्हरी करताना हल्ला

ते म्हणाले, लोकं निवडणुकीत पोस्टर लावतात, मतदारांना खाऊ घालतात त्यानंतर विजयी होता. पण माझा यावर विश्वासच नाहीये, आम्ही अनेकदा निवडणुका लढवल्या. सर्व प्रयत्न मी केलेले आहेत. एकदा एक प्रयोग मी केला होता, तेव्हा प्रत्येकी एक किलो सावजी मटण घरोघरी पोहचवलं, तरीही निवडणूक हरलो असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

तसेच पुढे बोलताना त्यांनी मतदारांवरही भाष्य करीत जनता खूप हुशार असल्याचं म्हटलं आहे. लोक म्हणतात, जे दिले जाते ते खा. ती आपल्या वडिलांची मालमत्ता आहे. पण मतदारांना ज्यांना मतं द्यायची असतात त्यांनाच ते मतदान करीत असतात, असंही ते म्हणाले आहेत.

जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता तेव्हाच त्यांचा तुमच्यावर विश्वास असतो आणि त्यासाठी कोणत्याही पोस्टर बॅनरची गरज नसते, अशा मतदाराला कोणत्याही लोभाची गरज नाही, कारण त्याचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो दीर्घकालीन आहे, अल्पकालीन नसल्याचं गडकरी म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube