कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची हत्या; पिझ्झा डिलिव्हरी करताना हल्ला

कॅनडात भारतीय विद्यार्थ्याची हत्या; पिझ्झा डिलिव्हरी करताना हल्ला

Indian Student Killed : कॅनडामध्ये एका 24 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा 24 वर्षीय विद्यार्थी कॅनडामध्ये फूड डिलिव्हरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. याच दरम्यान त्या विद्यार्थ्यावर नरधमांनी क्रुरपणे हल्ला केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.(canada indian student Gurwinder Nath killed attack delivering pizza )

शरद पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी? राष्ट्रवादीशी चर्चेनंतर थेट PM मोदींंनी दिली मोठी ऑफर

मृत भारतीय विद्यार्थी हा कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचं काम करत होता. याच दरम्यान ही घटना घडली. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरविंदर नाथ असं त्या मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना कॅनडामध्ये घडली आहे.

…त्यामुळे अजित पवार अडचणीत येतील पण मुख्यमंत्री होणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराने केला दावा

स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, गुरविंदर कारमधून पिझ्झा डिलिव्हरी करताना रस्त्यात चोरट्यांनी त्याची कार चोरण्याच्या उद्देशाने त्याच्यावर हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात गुरविंदर गंभीर जखमी झाला. त्यानंतर गुरविंदरला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गुरविंदर नाथ 9 जुलै रोजी कॅनडातील मिसिसॉगा येथील ब्रिटानिया आणि क्रेडिट व्ह्यू स्ट्रीट्सवर साधारणपणे 2:10 वाजता पिझ्झा डिलिव्हरी करत असताना अज्ञातांनी त्याच्यावर हल्ला केला आणइ त्यांचे वाहन चोरण्याचा प्रयत्न केला.

पील प्रादेशिक पोलिसांच्या होमिसाईड ब्युरोचे इन्स्पेक्टर फिल किंग म्हणाले, की, यामध्ये अनेक संशयित गुंतलेले आहेत आणि या विशिष्ट भागात ड्रायव्हरला प्रलोभन देण्यासाठी खाद्यपदार्थाची ऑर्डर दिली होती असे पोलिसांना वाटते. ते म्हणाले की, तपासकर्त्या पोलिसांना हल्ल्यापूर्वी दिलेल्या पिझ्झा ऑर्डरचे ऑडिओ रेकॉर्डिंग मिळवले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube