Download App

Tanaji Sawant : ‘मोदी हे महादेवाचा अवतार’ : तानाजी सावंतांचे विधान

  • Written By: Last Updated:

शिंदे गटाचे आमदार व आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ( Tanaji Sawant )  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी ( Narendra Modi )  एक विधान केले आहे. सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना थेट भगवान शंकरा सोबत केली आहे. माझ्या दृष्टीने मोदी हे महादेवाचा अवतार आहेत, असे विधान सावंत यांनी केले आहे.  यावेळी ते सांगली ( Sangali )  येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आमची टॅगलाईन होती माता सुरक्षित तर घर सुरक्षित,  कारगिल येथे गेल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तशाच प्रकारची टॅगलाईन वापरली, सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित. पंतप्रधान नरेंद्र मोदीं सारखा विश्वनेता ज्याची सर्व जगात ओळख आहे, जो सर्व विश्वाचे कल्याण चिंतितो अशा नेता जेव्हा  माझ्यासारख्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या व्यक्तीची टॅगलाईन वापरतो, तेव्हा माझा उर भरून आला अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

दरम्यान तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर घनाघाती टीका केली आहे.  मी सध्या आरोग्य मंत्री असून माझ्याकडे चार वेड्यांची इस्पितळे आहेत.  त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला असेल त्यांना या इस्पितळांपैकी जिथे जागा असेल त्या ठिकाणी  दाखल करू, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. या अगोदर आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते, त्यावर सावंतांनी ही टीका केली आहे.

follow us