नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलेत; व्हिडिओनंतर तनुश्री दत्ताचा खळबळजनक आरोप

Tanushree Dutta Crying Video : गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात असल्याचे अभिनेत्री तनुश्री दत्ताने व्हिडिओतून सांगितले होते. या व्हिडिओमुळे खबळळ उडालेली असतानाच आता तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) माझ्या जीवावर उठले असल्याचा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. मराठी वृत्त वाहिन्यांशी बोलताना तनुश्री दत्तने हे गंभीर आरोप […]

Letsupp Image   2025 07 23T133900.393

Letsupp Image 2025 07 23T133900.393

Tanushree Dutta Crying Video : गेल्या 4 ते 5 वर्षांपासून तिच्याच घरात तिचा छळ केला जात असल्याचे अभिनेत्री तनुश्री दत्ताने व्हिडिओतून सांगितले होते. या व्हिडिओमुळे खबळळ उडालेली असतानाच आता तनुश्रीने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) माझ्या जीवावर उठले असल्याचा खळबळ उडवून देणारा आरोप केला आहे. मराठी वृत्त वाहिन्यांशी बोलताना तनुश्री दत्तने हे गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकर आणि बॉलिवूडची (Bollywood) माफिया गँग मिळून मला त्रास देतेय, असं तनुश्री दत्ता म्हणाली. तसेच, नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत, मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत, असा आरोपही तनुश्री दत्तानं (Tanushree Dutta Video) केलाय.

हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थीनीचा विनयभंग; सीसीटीव्ही अन् सुरक्षाही नाही, नागपूर गव्हर्नमेंट हॉस्टेलचं भयान वास्तव

नेमकं काय म्हणाली तनुश्री दत्ता

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ज्या-ज्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या असल्याचेही तनुश्रीने म्हटले आहे. मी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे, ते माझं 4 ते 5 वर्षांचं फ्रस्टेशन असल्याचेही तिने सांगितले. माझे फोन, ईमेल हॅक केल्यामुळे त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी समजत होत्या. माझं कुठेही काहीतरी काम होत होतं, ते मध्ये येऊन ते सगळे बिघडवायचे असे सांगत 2020 नंतर माझे जेवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, त्यातून मला सिस्टमॅटिकली बाजूला केलं गेल्याचेही तनुश्रीने सांगितले.

मारकुटा सूरज चव्हाण पोलिसांनी शरण रातोरात जामीनही मंजूर; पडद्यामागे नेमकं काय घडलं?

केवळ नानाच नाही संपूर्ण बॉलिवूड माफिया गँग

माझ्यासोबत घडणाऱ्या सर्व गोष्टी 2018 नंतर सुरू झाल्याचे सांगत मी कुणाचं नाव तर घेत नाही. पण 2018 आधी माझा कधीच अपघात नव्हता.  नाना पाटेकर हा एकटा नाहीये, बॉलिवूडमधली माफिया गँग आहे, जी या सगळ्या काळ्या करतुदींमध्ये सहभागी असल्याचाही आरोप तनुश्रीने केला आहे.  माफिया गँगमध्ये कोण-कोण आहे, हे मी सांगू शकत नाही… पण मी हे सांगते की, सुशांत सिंह राजपूतसोबत ज्या-ज्या गोष्टी घडल्या, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आणि अजून घडतायत… फक्त फरक एवढाच आहे की, त्याचा मृत्यू झालाय आणि मी जिवंत आहे. याआधी तनुश्री दत्ताने 2018 मध्ये नाना पाटेकर यांच्या विरोधात लैंगिक छळाचा आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Exit mobile version