Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची राखी सावंतविरोधात तक्रार; काय आहे नेमकं प्रकरण?

Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची राखी सावंतविरोधात तक्रार; काय आहे नेमकं प्रकरण?

Tanushree Dutta FIR: बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutt) आणि बॉलिवूडची (Bollywood) ‘ड्रामा क्वीन’ अशी ओळख असलेली राखी सावंत (Rakhi Sawant) यांच्यातील वाद आता चांगलाच टोकाला पोहचला आहे. दोघांनीही एकमेकींवर अनेक आरोप- प्रत्यारोप करत आहेत. आता राखी सावंतमुळे आपल्या प्रतिमेला धक्का बसू नये यासाठी तनुश्रीने थेट कायदेशीर मार्ग निवडला आहे. अभिनेत्रीने राखीच्या विरोधात ओशिवारा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार (FIR) दाखल होत आहे.

राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केल्यावर सोशल मीडियासोबत बोलताना तनुश्रीने सांगितले आहे की, “मी राखी सावंत विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे. 2018 मध्ये मी टू (MeeToo) या चळवळीच्या दरम्यान तिने मला खूप त्रास दिल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी ड्रामाक्वीन राखी सावंत विरोधात अनेक कलमाअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ठरला एक एपिक पेज- टर्नर

तसेच “माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली जाणार आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची मी पोलिसांना सतत माहिती दिली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. तसेच योग्य ती कारवाई देखील करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

तसेच राखी सावंतबद्दल बोलत असताना तनुश्री म्हणाली आहे की,” एका गाण्यातून निर्मात्यांनी राखी सावंतला काढलं होतं आणि मला विचारणा केली होती. या एका कारणाने राखीने माझ्यासोबत कायम भांडायला सुरुवात केली. यामुळे निर्मात्यांनी पुन्हा एकदा त्या प्रोजेक्टमधून मला काढलं आणि राखीला घेतलं असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. अखेर आजपर्यंत हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला देखील आला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube