Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ठरला एक एपिक पेज- टर्नर

Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा ‘सुलतान ऑफ दिल्ली’ ठरला एक एपिक पेज- टर्नर

Sultan of Delhi: मिलन लुथरियाचा (Milan Luthria) “दिल्लीचा सुलतान” या वेब सिरीजची (Web series) प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्याचे बघायला मिळत आहे, (Social media) ते पाहण्यासाठी खूप प्रेक्षक देखील उत्सुक झाले होते. 1962 मध्ये सेट केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना दिल्लीतील कारस्थान आणि सत्ता संघर्षाच्या जगात घेऊन जातो. सध्या हा सिनेमा एक एपिक पेज- टर्नर ठरला आहे.

या सिनेमातील गाणं देखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. संगीताची अनोखी आवड असलेले मिलन लुथरिया यांनी सांगितलं आहे की, मला गीताच्या जगात अनेक अद्भुत प्रतिभांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, आणि माझी संगीताची आवड सर्वज्ञात आहे. तसेच कधी कधी मला प्रश्न पडतो की, गीतकार कसा विचार करतो. जेव्हा हे गाणे तयार झाले तेव्हा मी त्याच्या सुफी भावनेच्या प्रेमात पडलो. रचना पूर्ण होण्यासाठी मी पहिली ओळ “डमी” ओळ म्हणून सुचवली

लुथरिया यांनी सिनेमाबद्दल आपली भावना व्यक्त केले आहेत, ‘दिल्लीचा सुलतान’ हा महत्त्वाकांक्षा, कारस्थान आणि शक्तीच्या दुनियेतील एक भावनिक प्रवास दाखवला आहे. एक कथाकार म्हणून, प्रत्येक मिनिट नाटक, रहस्य आणि आश्चर्याने परिपूर्ण बनवणे हे माझे उद्दिष्ट होते. मी खूप आनंदी आहे.

Navratri Garbo Song: पीएम मोदींच्या गाण्यावर होणार गरबा! सोशल मीडियावर व्हिडिओ प्रदर्शित

या सिनेमातील पात्र हे या गाथेचे हृदय आहेत, जे एका विलक्षण कलाकाराने जिवंत केले आहेत. माझा प्रयत्न हा एक शो तयार करण्याचा आहे, जो एखाद्या कादंबरीसारखा मनोरंजक असणार आहे, अगदी छोट्या एपिसोडिक स्वरूपात….”

या सिनेमात ताहिर राज भसीन, मौनी रॉय या मुख्य कलाकारांनी “दिल्लीचा सुलतान” मधील त्यांच्या अपवादात्मक अभिनयाने या पात्रांना जिवंत केले आहे. या सिनेमाचा प्रत्येक भाग त्यातील पात्रांची गुंतागुंत आणि कथानकाची गुंतागुंत शोधण्यात यशस्वी होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube