Anjali Damania On Girish Mahajan : कुंभमेळा 2027 च्या तयारीसाठी राज्य सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. सरकारने नाशिकच्या तपोवन येथे साधुग्राम तयार करण्यासाठी परिसरातील 1800 पेक्षा जास्त वृक्षतोड करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला चारही बाजूने मोठा विरोध पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला मात्र यावेळी अंजली दमानिया यांचा तोल सुटला. एवढा विरोध होत आहे तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती की, त्यांनी नाशिकचे झाड तोडली असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या की, एवढा विरोध होत आहे तरी गिरीष महाजनांना (Girish Mahajan) एवढी मस्ती की, त्यांनी नाशिकचे झाड तोडली. लोकांनी आंदोलन करा आम्हाला जे करायचं ते आम्ही करणार असे ते आहे. गिरीश महाजन यांना लक्षात ठेवा. त्यांना राजकारणातून फेकून द्या असं या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मुंढवा जमीन घोटाळा (Mundhwa Land Scam Case) प्रकरणात गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंढवा प्रकरणात पुणे कोर्टात कलेक्टर तर्फे सेल डीड कॅन्सल करण्याचा अर्ज दाखल करण्यात आला. माझी भीती खरी ठरली, यात पुणे कोर्टात अर्ज करण्यात आले असून हा व्यवहार रद्द करण्यात यावा असे म्हणाल आहे, जमीन सरकारची आहे, सरकार, वतनाचे लोक आणि शीतल तेजवानी यांच नाव आहे फक्त, हा व्यवहार फक्त रद्द केला जातोय कारवाई न करता, हे चुकीचे आहे. हा व्यवहार सिव्हिल नाही तर क्रिमिनल कोर्टात व्यवहार रद्द झाला पाहिजे, कारवाई होऊन व्यवहार रद्द व्हावा. आता मला यावर लेखी उत्तर हवे आहे, हे उत्तर अधिवेशनात देण्यात यावे.
Special Work Human Rights Award : डॉ. केतन देशपांडे ‘विशेष कार्य मानवाधिकार पुरस्काराने’ सन्मानित
विरोधकांना विनंती आहे रे बाबा काहीतरी प्रश्न विचारा, सगळे पळून भाजपमध्ये जाऊ नका. काल माझ्याकडे महत्वाची माहिती आली आहे. मुंढवा प्रकरण संदर्भात पीडीएफ मिळण्याचा प्रयत्न करते. अजित पवार शितल तेजवाणी कोणालाच वाचवू नका असं या पत्रकार परिषदेमध्ये अंजली दमानिया म्हणाल्या.
