Teacher Ending His Life In Front Of Bank In Beed : खून, खंडणी, हाणामारी या घटनांचं बीड जिल्हा माहेरघर बनलेलं आहे. त्यामुळे राज्यात बीडमुळे मोठं तणावाचं वातावरण आहे. अशातच पु्न्हा एकदा बीडमध्ये (Beed) एका शिक्षकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या शिक्षकाने स्वत:च्या लेकीसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली (Teacher Ending His Life) असल्याचं समोर आलंय.
बँकेच्या प्रांगणात गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. ही घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. केजमधील स्वराजनगर भागात कृष्ण अर्बन कोपरेटिव्ह बॅंकेच्या शाखेजवळ ही घटना घडलेली आहे. तर आत्महत्या केलेल्या शिक्षकाचं नावं धनंजय अभिमान नागरगोजे असून ते केळगावच्या आश्रम शाळेत शिक्षक होते.
विधानपरिषदेसाठी मराठवाड्यातील ‘या’ दोन नावांपैकी एकाला संधी, इच्छुकांची मोठी रस्सीखेच
धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षकाने आत्महत्या करण्याअगोदर सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये नागरगोजे यांनी आपल्या मुलीची माफी मागितल्याचं दिसतंय. तसंच हा टोकाचा निर्णय घ्यायला कारणीभूत असलेल्या सहा जणांची नावे देखील त्यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिली आहे. अनेक वर्षांपासून पगार झालेला नाही. वरिष्ठांकडून देखील सातत्याने छळ होतोय, म्हणून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. या घटनेमुळे बीड पुन्हा हादरलं आहे.
धनंजय नागरगोजेंची शेवटची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी…
“श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले, काय करू? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच, तर कर एकदा तुझ्या बापूला. कारण, तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजुन काही कळत नाही, तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही. बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला. पण, या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मारणार आहेत. मला मारण्याचं कारण, म्हणजे मी फक्त विचारलं होतं की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय. अजून मला पगार नाही. आता पुढे काय करायचं? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण. दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा, हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली. तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरूवात केली.
मंत्रीपद तर गेलेच पण आमदारकीही..धनंजय मुंडेंबद्दल करुणा मुंडे यांचं मोठ विधान, काय म्हणाल्या?
श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती, पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही. बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर. माफी मागण्याच्या पण लायकीचो नाही मी, तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर. आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला. विक्रम बाबुराव मुंडे, विजयकांत विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे, उमेश रमेश मुंडे, ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे, गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड, हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत. कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्यामुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम”.
धनंजय नागरगोजे हे केळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते. 2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित करण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे धनंजय नागरगोजे अडचणीत होते आणि अखेर त्यांनी जीवन संपवलं आहे. त्यामुळे बीडमधील गुंडांची दहशत आणि गुन्हेगारी पुन्हा वारंवार समोर येत आहे. असे असताना पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं आहे.