मंत्रीपद तर गेलेच पण आमदारकीही..धनंजय मुंडेंबद्दल करुणा मुंडे यांचं मोठ विधान, काय म्हणाल्या?

मंत्रीपद तर गेलेच पण आमदारकीही..धनंजय मुंडेंबद्दल करुणा मुंडे यांचं मोठ विधान, काय म्हणाल्या?

Karuna Sharma on Dhananjay Munde : माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता. त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाइन तक्रार केली होती. करुणा शर्मा यांनी (Dhananjay Munde) धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केलाय. सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल, असंही त्या म्हणाल्या आहेत.

धनंजय मुंडे 302 च्या गुन्ह्यात आले नाही तर सरकार, संतोष देशमुख प्रकरणात जरांगे भडकले

सगळ्यांनी निवडणुकीवेळी बघितलं आहे की, मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर केले होते. तसंच, निवडणुकीत माझं नाव टाकलं नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझं नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकलं नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही. 2024 मध्ये माझ्या मुलांचं नाव टाकलं आणि माझे नाव गायब केलं. या सर्वावर माझी लढाई सुरू आहे.

आता त्यांचं वॉरंट निघेल, त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल. आज स्वतः धनजय मुंडे यांना जावं लागणार आहे. जसे मी बोलले होते की, मंत्रीपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. लोकांच्या पैशांचा गैरवापर आणि लोकांचे पैसे जाणे, हे आहे. पण, भ्रष्ट लोकांना मंत्रालयात बसविले तर काय न्याय मिळणार? त्यामुळं हे गेले पाहिजे. माझ्या पक्षाच्या माध्यमातून मी मुद्दा घेऊन याचिका दाखल करणार आहे, असे त्यांनी म्हटलं.

आमदार, मंत्र्यांचेही घर तोडा

कोणाचंही घर कधीही तोडणं, जाळणं नको. कोणत्याही व्यक्तीचे घर जाळणे, तोडणे हा अधिकार नाही. खरं घर जळायचं, तोडायचं असेल तर मंत्री, आमदाराचं तोडा. हे लोक मुलांना गुंड प्रवृत्तीमध्ये नेत आहेत. वाल्मिक कराडचे घर का नाही तोडले? बीडची परिस्थिती बिकट होती. पण, आता एसपी साहेबांनी ती आटोक्यात आणली पाहिजे. खोक्याचे घर तोडले आता वाल्मिक कराड आणि आमदार, मंत्र्यांचेही घर तोडायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube