Teacher Recruitment Details : राज्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या भरती (Teacher Recruitment) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शैक्षणिक संस्थांतील एकूण 21 हजार 678 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय 16 हजार 799 आणि मुलाखतींसह 4 हजार 879 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेल्या भरती प्रक्रियेला अखेर सुरुवात करण्यात आली आहे.
राज्यात शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी दोन लाख 16 हजार 443 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. या भरतीसाठी माध्यम बिंदूनामावली, विविध शिक्षक प्रवर्ग या सर्व विषयांच्या मागण्या प्रशासनाकडे वारंवार सादर केल्या जात होत्या. सध्याचे प्रचलित शासन निर्णय आणि सरकारच्या विविध विषयांवरील धोरणांचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी सिरीयस होईल? रोहित पवारांचा सवाल
या भरतीसाठी प्राधान्यक्रम देण्यासाठी आवश्यक सूचना आणि युजर मॅन्यूअल दिले आहे. उमेदवारांनी लॉग इन करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रमांक लॉक करण्यासाठीचा कालावधी 8 आणि 9 फेब्रुवारी असा देण्यात आला आहे. प्राधान्यक्रम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रकही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत पत्रव्यवहार करण्यासाठी edupavitra2022@gmail.com या मेलवर पत्रव्यवहार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
गटनिहाय रिक्त पदे
पहिली ते पाचवी 10 हजार 240
सहावी ते आठवी 8 हजार 127
नववी ते दहावी 2 हजार 176
अकरावी ते बारावी 1 हजार 135
पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती; शिक्षणमंत्र्यांची माहिती
माध्यमनिहाय रिक्त पदे
मराठी 18 हजार 376
इंग्रजी 931
उर्दू 1 हजार 850
हिंदी 410
गुजराती 12
कन्नड 88
तमिळ 8
बंगाली 4
तेलुगू 2
रिक्त पदांची माहिती
जिल्हा परिषद 12 हजार 522
महापालिका 2 हजार 951
नगरपालिका 477
खासगी शैक्षणिक संस्था 5 हजार 728