बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी सिरीयस होईल? रोहित पवारांचा सवाल

बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी सिरीयस होईल? रोहित पवारांचा सवाल

Mla Rohit Pawar : राज्यात सध्या शिक्षक भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे तर दुसरीकडे शिक्षकांची कंत्राटी भरती सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खोचक सवाल केला आहे. बावनकुळे साहेब, शिक्षक भरतीबाबत सरकार कधी सिरीयस होईल? असा रोहित पवारांनी एक्सवर पोस्टद्वारे केला आहे.

उपराजधानी नागपुरात कंत्राटी शिक्षकांच्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याच शिक्षक भरतीच्या जाहीरातीचा फोटो एक्सवर पोस्ट करीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारचे आभार मानले आहेत. त्यावरुन रोहित पवारांनी हा सवाल केला आहे.

भुजबळांचा विरोध वैफल्यातून; ‘कुणबी’ नोंद सापडल्यास OBC पासून कोणीही थांबवू शकत नाही

बावनकुळेंच्या पोस्टमध्ये काय?
शिक्षकांची कमतरता दुर करण्यासाठी सरकारने कंत्राटी तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या कंत्राटी शिक्षकांना जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून मानधन मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या दुरदर्षी व लोकहिताच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं आभार… अशी पोस्ट चंद्रशेखर बावनकुळेंनी केली होती.

रोहित पवारांची पोस्ट काय?
‘राज्यातील युवावर्ग #शिक्षक भरतीची वाट बघत असताना सरकार मात्र केवळ पोकळ घोषणा देऊन काहीच करत नाहीय. अशात सत्ताधारी मात्र #कंत्राटी_भरती लाही आभूषणासारखं मिरवत आहेत..
एकीकडं #कंत्राटी_भरती रद्द केल्याचं सांगायचं आणि दुसरीकडं कंत्राटी भरती सुरूच ठेवायची, याला सरकारचा दुटप्पीपणा म्हणायचं की गोंधळलेली स्थिती? @बावनकुळे साहेब सरकारचे आभार मानण्यापेक्षा हे #गोंधळलेले_निकामी_सरकार युवांसाठी महत्त्वाच्या असलेल्या #शिक्षक_भरतीबाबत #serious कधी होईल, हे सरकारला विचारा. शासनाने कंत्राटी भरती स्थगित करून शिक्षक भरती प्रक्रियेस गती देण्याची मागणी करावी’ असं पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube