Download App

स्थापत्य कला अन् काळी, राखाडी दगडं; प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी महाराष्ट्रातील मंदिरं

देशात अस्तित्वात असलेल्या एकूण मंदिरांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक मंदिरं असून महाराष्ट्रात एकूण 77 हजार 283 मंदिरं अस्तित्वात आहेत. ही मंदिरं प्राचीन संस्कृतीचा वारसा जपत आहेत.

Ancient temple in Maharashtra : देशात अस्तित्वात असलेल्या एकूण मंदिरांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक मंदिर (Maharashatra Mandir) आहेत. पुरातन काळापासूनच विविध कौशल्यतेने नटलेल्या मंदिरांच्या वास्तू महाराष्ट्रात आढळून येतात. महाराष्ट्रात जवळपास 77 हजार 283 मंदिरं आजतागायत अस्तित्वात आहेत. अनेकदा या मंदिरांवरांवर परकीय आक्रमण झाली आहेत, तरीही ही सर्वच मंदिरं आजही दिमाखात उभी आहेत.

पूजा खेडकरला कोर्टाचा दिलासा, तुर्तास अटकेपासून संरक्षण; ‘या’ दिवशी पुढील सुनावणी

महाराष्ट्रात ब्रम्ह, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं. तर वेरुळ-अजिंठा लेणीतील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, घृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ही ज्योतिर्लिंग महादेवाची प्रसिद्ध मंदिरं आहेत. यासोबतच पंढरपुरचा विठुराया, कोल्हापुरचं ज्योतिबा मंदिर, अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धीविनायक गणपती अशी प्रसिद्ध मंदिरं आहेत.

स्थापत्य कलेचा नमुना अन् दगडी बांधकाम :
महाराष्ट्रातील ही मंदिरं स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असेलेली ही प्राचीन मंदिर सर्वाचं लक्ष्य वेधतात. या मंदिरांवरचा दगड मजबूत असल्याने महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात. एकीकडे स्थापत्य कलेचे मंदिरं तर दुसरीकडे डोंगर फोडून मोठ-मोठ्या गुहांच्या आतमध्ये असलेली मंदिरंही महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. वेरुळचे कैलास मंदिर त्याचंच एक उदाहरण आहे.

Fussclass Dabhade: खुळ्या भावंडांची इरसाल गोष्ट ‘फसक्लास दाभाडे!’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

परकीय आक्रमणांमुळे मंदिरं उध्वस्त :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुस्लिम आक्रमणकर्त्यांकडून मंदिरांवर अनेकदा आक्रमण झाल्याचा इतिहास आहे. मुस्लिम राज्यकर्त्यांकडून मंदिरांना लक्ष्य केलं जात होतं. या काळात अनेक मंदिरं उध्वस्त झाली आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उध्वस्त झालेल्या मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झाल्याचं दिसून येतं. ज्या मंदिरांवर आक्रमण झाले आहेत, अशा मंदिरांच्या जीर्णाद्धारासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केल्याचंही इतिहासात सांगण्यात येतं, एवढंच नाही तर शिवकाळात मंदिरांना संरक्षणही मिळालं होतं.

भारतात नागर, द्रविड आणि वेसारा ही मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत. उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत. तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात. नागर आणि द्रविड शैलीतील मंदिरांचं मिश्र स्वरुप पश्चिम भारतातील अनेक भागांत आढळून येतात.

दरम्यान, भारतीय संस्कृतीत मंदिरे ही समाजाला जोडण्याचं काम करतात, कुठल्याही राष्ट्राचा संबंध हा संस्कृतीशी असतो. संस्कृतीमध्ये कला ही महत्वाची मानली जाते. प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होते, म्हणूनचं, मंदिरं ही एक प्रकारची टाइम मशीन आहे. ज्यातून इतिहास समजतो, म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होणार आहे.

follow us