Download App

Sangli Accident : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

Sangli Accident :  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला

  • Written By: Last Updated:

Sangli Accident :  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bangalore National Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला आहे.

माहितीनुसार अपघातातील मृत कुटुंब सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे आहे. ख्रिसमसच्या (Christmas) सुट्टीनिमित्त कुटुंब बॅंगळुरूवरून गावाकडे येत असताना कंटेनर ट्रक व्होल्वो कारवर पलटी झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरेजवळ ही दुर्घटना घडली आहे. अचानक कंटेनर ट्रक व्होल्वो कारवर पलटी झाल्याने 6  जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामध्ये चंद्रम इगाप्पागोळ (46),  धोराबाई (40),  गण (16), दिक्षा (10), आर्या (6) आणि विजयालक्ष्मी (35) असं मयताचे नाव आहे.

Naga Chaitanya : ‘नमो नमः शिवाय’ उद्या लाँच होणार तांडेल चित्रपटातील नवीन गाणे

माहितीनुसार, चंद्रम इगाप्पागोळ सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी असून ते  बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात या प्रकरणात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहे.

आश्वासने पूर्ण करणार अन् शेरो शायरी म्हणत ठाकरेंना टोला, सभागृहात शिंदेंची जोरदार फटकेबाजी

follow us