आश्वासने पूर्ण करणार अन् शेरो शायरी म्हणत ठाकरेंना टोला, सभागृहात शिंदेंची जोरदार फटकेबाजी
Eknath Shinde : हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा नाव न घेता टोला लावला आहे. तसेच पाच वर्षात आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करु अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ऐतिहासिक बहुमत घेऊन सरकारमध्ये आलेल्या महायुती सरकारचे हे पहिले हिवाळी अधिवेशन आहे. आमच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला याबद्दल मी जनतेला धन्यवाद करतो त्यांचे आभार मानतो. असं एकनाथ शिंदे म्हणाले. मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे आमची जबाबदारी वाढली असल्याची जाणीव आम्हाला आहे. जनतेला दिलेल्या आश्वासने आम्ही पूर्ण करू असा आश्वासन जनतेला देतो असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात आम्ही पाच वर्ष नाहीतर त्यापेक्षा जास्त काम केला आहे. गेल्या सरकारमध्ये सुरु असणाऱ्या योजना या सरकारमध्ये बंद होणार नाही आणि येत्या काळात जनतेच्या कल्याणासाठी नवीन योजना देखील सुरु होणार आहे. असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष गाठलेला दिसला असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लावला.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या वागणुकीत बदल होणार असं वाटले होते मात्र दुर्देवाने असं काही घडले नाही. विरोधकांकडून पुन्हा तोच आरोप करण्यात येत असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधंकाडून करण्यात येत आहे.
मोठी बातमी! लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी घेणार सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट
तर तूफानों में कश्तियां और घमंड में बड़े बड़े हस्तियां डूब जाती है! असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला इतका प्रचंड बहुमत मिळेल असं वाटलं नव्हतं मात्र आम्हाला लाडक्या बहिणींनी प्रचंड बहुमत दिला असेही विधान परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच पुढील पाच वर्ष विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.