बाबासाहेबांचा अपमान! अमित शाहांच्या तोंडून मनोविकृती बाहेर, उद्धव ठाकरे चांगलेच कडाडले
Udhav Thackeray On Amit Shah : केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या तोंडून मनोविकृती बाहेर पडली असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) अमित शाहांवर (Amit Shaha) चांगलेच कडाडले आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नावाचा उल्लेख करीत विरोधकांवर टीका केलीयं. शाहा यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून बाबासाहेबांचा अपमान केला असल्याचा सूर आवळण्यात येत आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीयं.
भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद; ब्रिटनचा ‘संतोष’ शॉर्टलिस्ट
उद्धव ठाकरे म्हणाले, अमित शाह यांनी उर्मटपणाने संविधान लिहिणाऱ्या महामानवाचा उल्लेख केलायं, हा उल्लेख अत्यंत हिणकस असून उद्दामपणे केलेला हा प्रकार आहे. आता भाजपच्या भोंगावरचा बुरखा फाटला असून हे भाजपाचं ढोंग आहे. भाजपचं हिंदुत्व म्हणजे मुॅंह में राम आणि बगल में छुरी असं आहे. भाजपवाल्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे, नेहरु नेहरु करात करता आता हे आंबेडकरांवर बोलायला लागले आहेत. एवढी त्यांची हिंमत वाढलीयं. अमित शाहांच्या विधानानंतर रामदास आठवले राजीनामा देणार का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केलायं.
तसेच भाजप आणि उर्मट नेते महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करीत आहेत, त्यांनी गुजरातला प्रकल्प पळवून नेले आहेत. संसदेत संविधानावर चर्चा सुरु आहे. याचवेळी आपल्याला संविधान दिलं त्यांच्यावर शाहांसारखा माणूस असा तुच्छतेने कसा बोलू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाहांना माफी मागण्यास सांगावं, अन्यथा भाजपला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अमित शाहांवर कारवाई करा नाही तर सत्ता सोडा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
एर्टिगा आणि इनोव्हाला विसरा… येत आहे ‘ह्या’ 3 स्वस्त 7-सीटर कार्स, किंमत फक्त 6 लाख रुपये
महाराष्ट्र गांडूळांचा प्रदेश असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटू लागलं आहे. भाजपवाले आंबेडकरांसह महाराष्ट्राचं नाव पुसायला निघालेले आहेत, जे नाव पुसायला निघालेत ते पुसले जातील पण आंबेडकरांचं नाव पुसणार नाही. डॉ . आंबेडकर याच मनोविकृतीमुळे त्रासले होते , त्यामुळेच त्यांनी धर्मांतर केलं , आज अमित शाहांच्या तोंडून तिच मनोविकृती बाहेर पडली असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.