भारताला धक्काच! ‘लापता लेडिज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाद; ब्रिटनचा ‘संतोष’ शॉर्टलिस्ट
Laapataa Ladies out of Oscar Race : भारतीय चित्रपटाला ऑस्कर मिळण्याचं स्वप्न यंदाही स्वप्नच राहणर आहे. कारण ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटात एकही भारतीय चित्रपट नाही. उलट यादी समोर आल्यानंतर भारताला मोठा धक्काच बसला आहे. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारतात प्रेक्षक आणि समीक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. त्यामुळे हा चित्रपट ऑस्कर मिळवील असे सांगितले जात होते. हा चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवण्यातही आला होता. परंतु, नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार हा चित्रपटही ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे. अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसने आज सकाळी याबाबत घोषणा केली.
Oscars: ऑस्करसाठी का पाठवण्यात आला ‘लापता लेडीज’ ? निवड समितीच्या अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं
भारतीय फिल्म फेडरेशनने सोमवारीच जाहीर केले होते की ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची 2025 मध्ये ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय फिल्म फेडरेशनच्या समितीने 29 चित्रपटांच्या यादीतून ‘लापता लेडीज’ ची ऑस्कर 2025 साठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड केली होती. या 29 चित्रपटांच्या यादीत ‘अट्टम’, ‘कल्की 2898 एडी’ आणि ‘ॲनिमल’ या चित्रपटांचाही समावेश होता.
परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार लापता लेडिज ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे. हा चित्रपट ऑस्करमध्ये कॅटेगरीत सिलेक्ट करण्यात आलेल्या १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. आता यादीतून पाच चित्रपटांना ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. त्यापैकीही एकाच चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळेल. बाकीच्या चित्रपटांना बाद म्हणून घोषित केले जाईल.
Kalki 2898 AD: प्रभासला मोठा धक्का! प्रदर्शित होताच ऑनलाइन लीक झाला कल्की 2898 एडी
ब्रिटनचा भारतीय संतोष शॉर्टलिस्ट
ब्रिटनची सहनिर्मिती असलेला भारतीय पार्श्वभुमीवरील संतोष हा चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. ब्रिटीश भारतीय दिग्दर्शक संध्या सुरी यांचा संतोष हा चित्रपट ब्रिटीश अकादमीने ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी युकेकडे पाठवला होता. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत केलेला आहे. या चित्रपटात शहाना गोस्वामीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे यांच्यासह अन्य कलाकार सहायक भूमिकेत आहेत.
अनुजा शॉर्टफिल्मही शॉर्टलिस्ट
लापता लेडिज चित्रपट शर्यतीतून बाद झाला असला तरी अनुजा ही भारतीय शॉर्टफिल्म ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट झाली आहे. या शॉर्टफिल्मचे निर्माते गुनीत मोंगा आहेत. ही फिल्म कापड उद्योगातील बालमजुरीची समस्या जगतासमोर मांडते. यामध्ये मराठी चित्रपटातील कलाकार नागेश भोसले यांची भूमिका आहे. तसेच अन्य कलाकारही आहेत.
२९ नामांकनांच्या यादीतून ‘‘लापता लेडीज’ निवडले
जाह्नू बरुआ म्हणाले होते, की “भारताचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात अचूक चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत प्रवेश म्हणून पाठवला जाणे महत्त्वाचे आहे. २९ नामांकन मिळालेल्या चित्रपटांपेक्षा चांगला चित्रपट असू शकतो. पण ज्युरी त्यांना दिलेल्या यादीतूनच निवडू शकतात, बरोबर? अशा परिस्थितीत, ज्युरी टीमला मिसिंग लेडीज या जेतेपदासाठी सर्वात योग्य वाटले.” जाह्नू बरुआ यांच्या नेतृत्वाखालील 13 सदस्यीय समितीने ‘एकमताने’ किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड केली होती.