मोठी बातमी! लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी घेणार सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) देखील उपस्थित राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी परभणीत संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतला होता. यात सोमनाथ सुर्यवंशी यांचा देखील समावेश होता मात्र न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती विधासभेत बोलताना दिली आहे.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचे शिक्षण घेत होते. जाळपोळ प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांना कोठडीत मारहाण करण्यात आली नव्हती त्यांना श्वासनाचा आजात होता अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशी देखील माहिती त्यांनी दिली होती.
तर दुसरीकडे या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर जोरदार टीका केली होती.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, परभणी प्रकरणातील मृत भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांची पोलिसांनी केलेली ही हत्या आहे का? सुर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले आहे. एखाद्याचा जीव जावा इतकी मारहाण पोलिसांनी का केली? पोलिसांना मारहाण करण्याचे आदेश कोणी दिले होते? पोलिसांना काय लपवायचे होते? अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांना अनेक जखमा झाल्याचा उल्लेख आहे आणि पोलीस सांगत होते हार्ट अटॅक आला? यावरून पोलिसांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस आंबेडकरी जनतेवर बळाचा वापर करत होते, मारहाण करत होते याचे व्हिडिओ सुर्यवंशी यांनी काढले हा राग पकडून पोलिसांनी सुर्यवंशी यांना अमानुष मारहाण केली का ? सोमनाथ सुर्यवंशी यांचा हा मृत्यू नाहीतर पोलिसांनी केलेली हत्या आहे का असा प्रश्न आज निर्माण होत आहे. या प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकारी निलंबित झालेच पाहिजे! असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“फडणवीस हेच मंत्री, बाकी सर्व बिनखात्याचे मंत्री”, ठाकरेंच्या आमदारांंचा खोचक टोला