फडणवीस साहेब, मला 10 लाख नको, माझा मुलगा परत द्या…; सोमनाथ सुर्यवंशींच्या आईचा टाहो…

मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. मला यावर न्याय हवा आहे.

  • Written By: Published:
Somnath Suryavanshi Death

Somnath Suryavanshi Death: परभणी जिल्ह्यात सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) नावाच्या तरुणाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणात पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. रिपोर्टनुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांचा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मृत्यू झाला. मात्र, हे आरोप सोमनाथ सूर्यवंश यांच्या आईने फेटाळून लावले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जाहीर केलेली 10 लाखांची मदतही त्यांनी नाकारली आहे.

शेतकऱ्यांना सोलर पंप मिळेपर्यंत वीज जोड द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आमदार काळेंनी वेधले सभागृहाचे लक्ष 

परभणी हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती. मात्र, पोलिस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात निवेदन देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे झाल्याचा दावा केला होता. फडणवीस म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी कायद्याचे शिक्षण घेत होते. जाळपोळ प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना कोठडीत मारहाणही झालेली नाही. त्यांना श्वसनाचा आजार होता, असं अहवालात सांगण्यात आलं. मात्र, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, वाल्मिक करांडाबद्दल म्हणाले, ‘ते नागपुरात…’ 

मला 10 लाख रुपये नको
तर मला मुख्यमंत्र्यांचं बोलणं मान्य नाही. माझ्या मुलाला मारहाण करून त्याचा जीव घेतला. मला यावर न्याय हवा आहे. मंत्र्यांच्या आश्वासनांवर माझा विश्वास नाहीये. मला 10 लाख रुपये नको आहेत. ते 10 लाख रुपये मंत्र्यांच्या खिशातच ठेवा, नाहीतर कोणत्या तरी पोलिसाला खाऊ घाला. नाश्ता करायला द्या. खाण्यापिण्याने मारायला ताकद येते. मला माझा मुलगा हवा आहे, असा सोमनाथ यांच्या आई वत्सला सुर्यवंशी म्हणाल्या.

त्या पुढं म्हणाल्या, माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता. तो एक नंबर होता. कसलं इंजेक्शन नाही की गोळी नाही. त्याच्यावर कसलेच उपचार सुरू नव्हते.

नाहीतर मी इथेच जीव देईन
पोलिस अधिकाऱ्याला निलंबित न करता त्याला जन्मठेपेची शिक्षा द्या. 10 ते 15 तारखेपर्यंत ज्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतला, त्या प्रत्येकाला जन्मठेप द्या. मला लवकरात लवकर न्याय मिळावा. नाहीतर मी इथेच जीव देईन, असा आक्रमक पवित्राही त्यांनी घेतला.

follow us