Sushma Andhare On Kirit Somayya : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत भाजपवरच निशाणा साधला आहे.
अंधारे म्हणाल्या की, “भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा? महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी, या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय.”
‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर सोमय्या बोललेच; थेट फडणवीसांकडे केली ‘ही’ विनंती
दरम्यान, सोमय्या यांच्या या कथित व्हिडीओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच सोमय्यांच्या चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्वत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
भाजपने मोठ्यात मोठी प्रकरण लिलया जिरवून टाकली. पण सोमयाचा व्हिडिओ आत्ताच का यावा?
महाराष्ट्रहिताच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरलेली भाजपा आमदार खरेदीविक्री, पक्ष फोडाफोडी,
या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला वेगळं वळण देण्यासाठी भाजपाने किरीट सोमय्यांचा बळी दिलाय. @ShivSenaUBT_— SushmaTai Andhare (@andharesushama) July 17, 2023
सोमय्या म्हणाले, एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही. अशा सर्व आरोपांची व्हिडिओ क्लिप/क्लिप्स सत्यता तपासावी, चौकशीही करावी, अशी विनंती मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. सोमय्या यांनी स्वतःच ट्विट करत याबाबत माहिती दिली.