Jyoti Waghmare : ठाकरेंचा दसरा मेळावा सत्तापिपासूंचा ; ज्योती वाघमारेंचा उबाठावर हल्लाबोल

Jyoti Waghmare : आपले नेते एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काम करत आहेत. तर दुसरीकडे उबाठा नेते रिजीम चेंज (सत्ताबदल)

Jyoti Waghmare

Jyoti Waghmare

Jyoti Waghmare : आपले नेते एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी काम करत आहेत. तर दुसरीकडे उबाठा नेते रिजीम चेंज (सत्ताबदल) करण्याची भाषा करत असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करत आहे मात्र उबाठा नेते रिजीम चेंज करण्याची भाषा करत आहे. कारण त्यांना दुष्काळ दिसत नाही. त्यांना शेतकरी दिसत नाही. त्यांना दिसते फक्त खुर्ची त्यांना दिसते फक्त सत्ता. त्यामुळेच तिकडचा दसरा मेळावा हा सत्तापिपासूंचा दसरा मेळावा आहे आणि इकडचा दसरा मेळावा हा शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांचा आहे असं गोरेगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या.

संगमनेरला विजयादशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे शिस्तबद्ध पथसंचलन ; आमदार खताळांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग-

पुढे बोलताना ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) म्हणाल्या की, मराठी माणसांसाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना (Shivsena) काम करत आहेत. ज्या इंग्रजांनी 150 वर्षे आपल्यावर राज्य केलं त्यांच्याच देशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन तीन पुरस्कार मिळाले आहे. लाडकी बहिणसाठी एकनाथ शिंदे यांनी काम केलं. घरात आई, गोठ्यात गाई, शिर्डीत साई, कोल्हापुरात अंबाबाई आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी फक्त एकनाथ भाई या घोषणेसह आपल्याला येणाऱ्या काळात राज्यात काम करायचं असं देखील यावेळी ज्योती वाघमारे म्हणाल्या.

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध; विखे-थोरात-शिंदे-लंके यांच्यातील चर्चेत काय निर्णय होणार?

Exit mobile version