Download App

ठाकरे महाराष्ट्रातले नाही, मगधहून आले अन्…, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा हल्लाबोल

Avimukteshwaranand On Thackeray Brothers : भाषावादावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलेचं राजकारण तापले आहे.

  • Written By: Last Updated:

Avimukteshwaranand On Thackeray Brothers : भाषावादावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलेचं राजकारण तापले आहे. मराठी आणि हिंदी भाषेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु होत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला. वाढता विरोध पाहता राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द करत डॉ. नरेंद्र जाधव (Narendra Jadhav) यांच्या अध्यक्षेतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे सरकारच्या या निर्णयानंतर दोन्ही ठाकरे बंधूंकडून 5 जुलैला विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली आहे.याच दरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद (Avimukteshwaranand) यांनी मराठी आणि हिंदी भाषेवरुन ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत ठाकरे कुटुंब महाराष्ट्रात मगध येथून आलं आहे आणि आता दोन्ही भाऊ फक्त मराठीच्या नावाने राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, मराठीचा आग्रह जे धरत आहेत ते ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या बाहेरुन आले आहेत. त्यांच्याच कुटुंबातील आजोबा- पणजोबांनी जे लिहून ठेवले आहे त्यात हे म्हटलं आहे की आम्ही मगधहून आलो होतो. मगधहून इथे आलात तेव्हा तुम्ही मराठी होतात का? महाराष्ट्राने मगधहून आलेल्या ठाकरेंना स्वीकारलं, त्यांना इतकं मोठं केलं की त्यांचे वंशज मराठीसाठी भांडत आहेत. मराठीला थोबडीत देणारी भाषा, मारहाण करणारी भाषा बनवायची आहे का? राज ठाकरे जे म्हणाले मराठी न बोलणाऱ्यांना थोबाडीत ठेवून द्या पण व्हिडिओ काढू नका. एक माणूस खुलेआम गुन्हा करायला सांगतो आणि पुरावे ठेवू नका म्हणतो याची दखल सरकारने घेतली पाहिजे असं शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

महाराष्ट्रात फक्त 2 तालुक्यांत नक्षलवाद, मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसेभेत दिली A टू Z माहिती

तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांची युती यशस्वी होईल असं वाटत नाही. कारण राज ठाकरे यांचं राजकारण करण्याची पद्धत आणि उद्धव ठाकरेची पद्धत वेगळी आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे सहकारी सध्या जे आहेत त्यांचीही धोरणं वेगळी आहेत. त्यामुळे दोघे भाऊ जास्त काळ एकत्र राहणार याची शक्यता कमी आहे. असं देखील शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.

follow us