नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud)यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)घटनापीठासमोर सुनावणी मागे तीन दिवस सलग सुरु राहिली. आत्ता सलग तीन दिवस सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde)
मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर या आठवड्यात सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आलीय. गत आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी केल्यानंतर चालू आठवड्यात प्रदीर्घ सुनावणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता सुषमा अंधारेंचंही ठरलं, ‘मातोश्री’बाबत केलं मोठं वक्तव्य
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी होणारंय. दि. 21, 22 आणि 23 फेब्रुवारीला घटनापीठ सुनावणी करणार असल्याचं सांगण्यात आलंय.