आता सुषमा अंधारेंचंही ठरलं, ‘मातोश्री’बाबत केलं मोठं वक्तव्य
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban)चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना शिवसेना गमवावी लागली आहे. मात्र या निर्णयानंतर शिंदे गटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, आयोगाच्या निकालानंतर काल काल मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते. सामान्य शिवसैनिक ठाकरे गटाबरोबर असल्याचं दिसते आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही आपण ठाकरे गटासोबत असल्याचं सांगितले आहे.
निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयाला ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. ठिकठिकाणी आंदोलने, निषेध व्यक्त केला जात आहे. आयोगाच्या निकालानंतर परभणीतील शिवसैनिकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, आता सुषमा अंधारे यांनी ट्विट करत आपण मातोश्री सोबत असल्याचं सांगितले आहे. शिंदे गटाने धनुष्यबाण आणि पक्ष नाव हे भाजपच्या मदतीने हिरावले असल्याची टीकाही अंधारे यांनी केली.
त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की “तुमच्याकडे चिन्हही नाही.. नाव ही नाही.. आम्ही महाशक्तीच्या सहकार्याने सगळेच तुमच्याकडून कपटनीतीने हिरावून घेतले आता तुम्ही काय करणार ?” असे खुनशीपणे विचारणाऱ्याना हे ठणकावले पाहिजे, “आम्ही कालही..आजही आणि उद्याही मातोश्री सोबतच असल्याचं त्यांनी सांगितले आहे. आदित्योदय होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"तुमच्याकडे चिन्हही नाही.. नाव ही नाही.. आम्ही महाशक्तीच्या सहकार्याने सगळेच तुमच्याकडून कपटनीतीने हिरावून घेतले आता तुम्ही काय करणार ?"
असे खुनशीपणे विचारणाऱ्याना हे ठणकावले पाहिजे, "आम्ही कालही..आजही आणि उद्याही मातोश्री सोबतच.."
#आदित्योदय होणारच.! @AUThackeray pic.twitter.com/ctcQPlv6sV— SushmaTai Andhare (@andharesushama) February 19, 2023
भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी, ‘त्याला मी भीक घालत नाही…’
दरम्यान, धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गटाने जल्लोष साजरा केला. तर निडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. अनेक शिवसैनिक आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं सांगत आहेत.