भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी, ‘त्याला मी भीक घालत नाही…’

भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी, ‘त्याला मी भीक घालत नाही…’

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. याचाच प्रत्यय उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात सावंत-पाटील वादात दिसून आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanaJagjitSingh Patil) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

तानाजी सावंत म्हणाले, कोणाला काय वाटतंय? त्याला मी भीक घालत नाही, मला त्याच काही देणे घेणे नाही. नुसतं बोलणं वेगळं असतं. गेली 30-40 वर्ष जिल्हा मागास ठेवला, सत्ता होती ना तुमच्याकडे? त्यावेळी काय केले? असा प्रश्न जाहीर भाषणातून उपस्थित केला.

मोठं आणि खोट रेटून बोलायचं जनतेची प्रगती होऊ द्यायची नाही. लोक माझ्यामागे राहतील की नाही? या भीतीमुळे प्रगती आणि विकास करायची नाही, असे म्हणत सावंत यांनी टीका केली.

अमित शाह यांच्या पत्नी सोनम यांचं माहेरात मराठीतून भाषण, शाळेच्या आठवणी सांगितल्या

गेल्या 40 वर्षात विकास न झाल्याचा मुद्दा मंत्री सावंत यांनी काढून पाटील कुटुंबाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात थेट टार्गेट केले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी शिवजयंती कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांना राजकीय कटुता बाजूला ठेवून आदबीने जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात ठेवून सूचक राजकीय इशारा दिला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार पाटील यांच्यावर टीका केली.

माझं एक स्वप्न आहे, प्रगती ही नेत्यांची न होता जनतेची व्हावी. सर्वसामान्य जनतेची प्रगती पहिल्यांदा व्हायला हवी, जनतेची प्रगती झाली की निश्चित जिल्ह्याची प्रगती होते हे व्हिजन असले पाहीजे, असे सावंत म्हणाले.

काही नेत्यांना इतकी भीती वाटते की जनतेची प्रगती झाली की हे लोक माझ्या मागे राहतील की नाही? मग प्रगतीच करायची नाही. मोठं मोठं खोटं रेटून बोलायचं, त्याच्यामुळे माझं व त्यांचं व्हिजनमध्ये जमीन असमानचा फरक आहे. जोपर्यंत सत्ता आहे, सत्तेत आहे आणि सहीचा अधिकार आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सामान्य जनतेसाठी तो अधिकार वापरून काम करेल, असा विश्वास मंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

सगळ्यांनी ओरडायचं, रडायच आमचा जिल्हा मागासलेला आहे मात्र त्यासाठी आपण काय पावले उचलली याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मागील सत्तेत 4 महिने मंत्री असताना जलसंधारणाची अनेक कामे केली. सरकार स्वतःसाठी चालवायचे की जनतेसाठी चालवायचे हे नेत्यांनी पहिल्यांदा ठरविले पाहिजे. आपण विश्वस्त असतो मालक नाही ही भूमिका हवी, असे सावंत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube