Thackerays MLA Sachin Ahir files nomination for Legislative Council Deputy Chairman post on behalf of Shiv Sena : शिंदेंकडून ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता खासदारांनंतर अहिर देखील शिवसेनेत जाणार का? या चर्चांना उधान आले आहे.
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं! ‘कोलावेरी डी’ फेम कंपोझरसोबत बांधणार गाठ
हा अर्ज दाखल करताना महायुतीच्या सर्व नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्याचबोरबर माजी उपसबापती राहिलेल्या निलम गोऱ्हे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट आमदार मनीषा कायंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच; गोऱ्हेंसह आणखी दोन नावांची चर्चा
यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, सचिन अहिर हे शिवसेनेचे आमदार होते आणि आता ते शिवसेनेतच आले आहे. त्यांच्या मतदारसंघातील इतरांनी केलेलं अतिक्रमण आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हे दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
WhatsApp चं यूजरनेम बुकिंग सुरू; आता नंबरशिवाय करता येणार चॅटिंग, वाचा डिटेल्स
तर मनिषा कायंदे म्हणाल्या की, आमचे नेते एकनाथ शिंदे यांना पक्षाची वाढ करायची आहे. त्यासाठी आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. त्याला विधान परिषदेतील ऑपरेशन टायगर असं म्हणतात. असं म्हणत यावेळी कायंदे आणि शिरसाट यांनी खासदारांनंतर अहिर देखील शिवसेनेत दाखल झाले असल्याचं म्हटलं आहे.
