Download App

Gautami Patil चा चोरुन शूट केलेला ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, गुन्हा दाखल

पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातील तरुणांना भूरळ पाडणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गौतमी पाटील कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ चोरुन चित्रित करुन व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे.

पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलला निमंत्रित केले असतानाच त्यावेळी एका रुममध्ये कपडे बदलत असतानाचा अज्ञाताकडून चोरुन हा चित्रित करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व

तक्रारीत म्हटले, गौतमी पाटीलला पुण्यात कार्यक्रमानिमित्त बोलविण्यात आले होते. त्यावेळी गौतमी पाटीलचा कपडे बदलण्याचा हा व्हिडिओ चोरुन चित्रित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ गौतमी पाटीलला बदनाम करण्यात येणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

‘व्वा रे व्वा..चोर ते चोर वर शिरजोर’, भास्कर जाधवांनी शिंदे गटाला डिवचलं

त्यासोबतच फिर्यादी आणि इतर सहकाऱ्यांचेही व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी देण्यात आल्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटले आहे. एकंदरीत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर ज्या तीन इन्स्टाग्राम अकाऊंट असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अश्लील नृत्याप्रकरणी गौतमी पाटील सारखीच वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. अश्लील नृत्या प्रकरणी सातारा न्यायालयाकडून गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश

तर महाराष्ट्रात लावणी संस्कृती असली पाहिजे मात्र, अश्लीलपणा नको, या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तंबी देखील दिली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने अजित पवारांची माफी मागितली होती.

वादाच्या भोवऱ्यात अडकूनही तरुणांमध्ये गौतमी पाटीलची क्रेझ कायम असल्याचं दिसून येत आहे. अहमनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गौतमी नृत्य सादर करीत असताना प्रेक्षकांकडून पैसे उधळण्यात आल्याचा प्रकार घडला.

यावेळी प्रेक्षकांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी गर्दीवर लाठीचार्ज केला होता. त्यानंतर आयोजकांना कार्यक्रम बंद करावा लागला होता. त्यानंतर गौतमी पाटीलला पोलिस बंदोबस्तात तेथून बाहेर पडावं लागलं होतं.

दरम्यान, गौतमी पाटीलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Tags

follow us