‘व्वा रे व्वा..चोर ते चोर वर शिरजोर’, भास्कर जाधवांनी शिंदे गटाला डिवचलं

‘व्वा रे व्वा..चोर ते चोर वर शिरजोर’, भास्कर जाधवांनी शिंदे गटाला डिवचलं

ठाणे : आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय म्हणताय अन् दावोसला मोदींचा माणूस असल्याचं सांगता, व्वा रे व्वा चोर ते चोर वर शिरजोर, या शब्दांत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. भास्कर जाधव ठाण्यात शिवगर्जना मेळाव्यात बोलत होते.

ज्या गद्दारांनी शिवसेना पक्ष फोडला आहे, त्यांनाच शिवसेना नाव आणि चिन्ह देण्यात आल्याची देशातली ही पहिलीच घटना असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांना डिवचलं आहे.

Kasba Chinchwad Bypoll : संजय राऊतांनी व्यक्त केली वेगळीच भीती; म्हणाले, हा तर त्यांचा प्रशासनावर..

जाधव म्हणाले, देशात पक्ष फुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात प्रथमच ज्या गद्दारांकडून पक्ष फोडण्यात आला त्यांना पक्षाचं चिन्ह आणि नाव देण्यात आलं आहे. ही देशातली पहिलीच घटना आहे. याआधीही अनेकजण पक्षातून बाहेर पडले आहेत. शरद पवारही काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केला नसल्याचं जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी होण्याआधीच विरोधकांकडून आनंद, जल्लोष साजरा करण्याचे सांगण्यात येत होते. निवडणूक आयोगाचा निकाल हा पक्षाच्या कार्यालयातून लिहिण्यात आला होता. आणि तोच निकाल निवडणूक आयोगाने दिला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Women T20 World Cup : आज रंगणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत, त्याचं कोणाच्या बटीक झालेल्या असतील तर आता शेवटचं न्यायालय जनताच आहे, त्याच न्यायालयात आपण जाऊन न्याय मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. विरोधक सारखाचं खोटा आव आणत आहेत. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात असल्याचं सांगितलं जातंय. व्वा रे व्वा चोर ते चोर वर शिरजोर, अशी टीका भास्कर जाधव यांनी विरोधकांवर केली आहे.

तुम्ही कोणत्या तोंडाने बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा फोटो तुमच्या बॅनरवर लावता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत दावोसला गेल्यानंतर तुम्ही मी नरेंद्र मोदींचा माणूस असल्याचं ठणकावून सांगत आहात. नूकत्याच झालेल्या भाषणात अमित शाह माझे वडील असल्याचंही तुम्ही सांगताहेत. उद्धव ठाकरे वारंवार सांगताहेत माझा बाप चोरला पण दुसऱ्याला बाप म्हणू नका, या शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.

दरम्यान, जोपर्यंत घात होत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवायला हरकत नाही. निवडणूक आयोगाने आमचा विश्वास घात केला आहे आता न्यायासाठी जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube