Women T20 World Cup : आज रंगणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

Untitled Design (84)

नवी दिल्ली : महिला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आज रविवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळवला जाणार आहे. दरम्यान इतिहास पहिला तर ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे ज्याने सर्वाधिक वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

तत्पूर्वी रोमहर्षक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. दुसरीकडे दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला. या स्पर्धेत हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघ गट फेरीत आमनेसामने आले होते आणि तेथे ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 124 धावा केल्या होत्या. अवघ्या 16.3 षटकांत ऑस्ट्रेलियाने ते सहज मिळवले.

महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवार, 26 फेब्रुवारी रोजी अंतिम सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच 6 वाजता होईल. उभय संघांमधील हा अंतिम सामना केपटाऊन येथील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका लढतीसह सर्व T20 विश्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल. तसेच तुम्ही हॉटस्टारवर T20 विश्वचषक 2023 च्या सर्व सामन्यांचे थेट ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.

ऑस्ट्रेलिया – मेग लॅनिंग (कर्णधार), अॅलिसा हिली, डी’आर्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गर्थ, हेदर ग्रॅहम, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, ताहलिया मॅकग्रा, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड आणि जॉर्जिया वेअरहॅम

दक्षिण आफ्रिका: सुने लूस (कर्णधार), क्लो ट्रायनॉन, अनेके बॉश, ताजमिन ब्रिट्स, नदिन डी क्लर्क, हेन्री डेर्कसेन, लारा गुडॉल, शबनीम इस्माईल, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, मसाबता क्लास, नॉनकुलुलेको मलाबा, डेल्मी टकर

Tags

follow us