अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भावाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं दिसून येतंय. त्याचच आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या (Arun Gawali) भावानंही शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केलाय. त्यामुळं आता राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांची ताकत वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मुंबईच्या भायखळ्यामधील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे भाऊ प्रदीप गवळी आणि माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी वर्षा निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 10.45 टक्के मतदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रवेशाचे काही फोटो ट्वीट करत ही माहिती दिलीय. मुख्ममंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, मुंबईतील भायखळा परिसरातील माजी नगरसेविका वंदना गवळी आणि प्रदीप गवळी यांच्यासह अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

त्यासोबतच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर विभागातील सेंचुरी रेयॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या सगळ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशा आशयाचं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलंय.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांना हवी असलेली या भागातील प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील, त्या सोडवण्याचं काम तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथं केलं जाईल. हा विश्वास आपल्याला मी देऊ इच्छितो. गेल्या सहा-सात महिन्यात बाळासाहेबांच्या विचारांचा सरकार आपण स्थापन केल्यानंतर या राज्यातल्या अगदी जिल्ह्या-जिल्ह्यातून, तालुका-तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होताहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube