चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 10.45 टक्के मतदान

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 10.45 टक्के मतदान

पुणे : कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By Election)आज मतदान (Voting)सुरु आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 10.45 टक्के मतदान झालंय. अनेक मतदारांनी सकाळी-सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. या मतदानासाठी दोन्ही मतदारसंघात मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय. ईव्हीएम मशीन (EVM machine) बिघडल्यानं मतदान केंद्रांवर मतदान थांबवावं लागलं. मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीमनं ईव्हीएम मशिन बदलल्यानंतर मतदानाला सुरळीत सुरुवात झालीय.

कसबा विधानसभा मतदारसंघातील 135 आणि चिंचवड मतदारसंघातील 255 मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्यानं लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

By Election : मतदानासाठी ती लंडनहून थेट पुण्यात… म्हणाली मतदानाचा हक्क का सोडू?

विशेष म्हणजे मतदानासाठी अमृता देवकर ही तरुणी लंडन मँचेस्टर येथून थेट कसब्यात आलीय. 24 तासाचा प्रवास करून ही तरुणी मतदानाचा हक्क बजवण्यासाठी पोहोचली आहे. चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय.

चिंचवडमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आलीय. ईव्हीएम मशीन बिघडल्यानं मतदान केंद्रांवर मतदान थांबवावं लागलं. मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीमनं ईव्हीएम मशिन बदलल्यानंतर मतदानाला सुरळीत सुरुवात झालीय. कसबा विधानसभा मतदार संघात संघामध्ये एकूण 2 लाख 75 हजार 679 मतदार असून 270 मतदान केंद्रावर मतदान होणारंय. आज 26 फेब्रुवारीच्या मतदान प्रक्रियेसाठी 1 हजार 250 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube