By Election : मतदानासाठी ती लंडनहून थेट पुण्यात… म्हणाली मतदानाचा हक्क का सोडू?

By Election : मतदानासाठी ती लंडनहून थेट पुण्यात… म्हणाली मतदानाचा हक्क का सोडू?

पुणे : कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. आज या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा हक्क हा महत्वाचा असल्याची प्रचिती या निवडणुकीत आली. कारण म्हणजे एक तरुणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट लंडनहून पुण्यात परतली. मतदानाचा हक्क का सोडू असे म्हणतच या तरुणीने मतदान करत एक अनोखा संदेश मतदारांना दिला आहे.

पुण्यातील कसबा (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad)विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदान सुरु आहे. यातच या निवडणुकीत चर्चा रंगली ती म्हणजे मतदानासाठी थेट लंडनहून परतलेल्या तरुणीची… अमृता देवकर असे या तरुणीचे नाव असून कसबा पोटनिवडणुकीतील आपल्या मतदानासाठी ती थेट लंडनहून पुण्यात आली आहे.

यावेळी बोलताना अमृता म्हणाली, माझे लहानपण पुण्यात गेले, आता मी लंडन येथील मँचेस्टर येथे राहते. आज मतदानासाठी पुण्यात आले आहे. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते सर्वांनी बजावले पाहिजे, असा संदेश देखील अमृताने मतदारांना दिला. तसेच पुढे बोलताना ती म्हणाली, मी मतदानाचा हक्क का सोडू? तसेच प्रत्येकानी मतदान करावे, मतदानाचा हक्क कोणीही गमावू नका, असा संदेश अमृता देवकर हिने दिला आहे.

अमृता देवकर खास कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी पुण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रशालेत येऊन आपला मतदानाचा हक्क अमृताने बजावला. यावेळी तिचे कुटुंबीय तिच्यासोबत होते. त्यांनी यावेळी पुण्यातील विविध आठवणींना उजाळा दिला.

यावेळी बोलताना अमृता म्हणाली की, निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराने नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे. कसब्यात असलेल्या नागरी समस्या कशा दूर केल्या जातील यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी अमृताने केली आहे.

आम्ही लंडनमध्येही मतदान करू शकतो
आपल्या येथील मतदान व लंडन येथील मतदान यावर अमृताला विचारण्यात आले असता ती म्हणाली की, आम्ही लंडन मधील नागरिक नसलो तरी आम्ही तिथे राहतो म्हणून तेथील विकासासाठी आम्ही मतदान करू शकतो. तेथील उमेदवार देखील अशाच प्रकारे प्रचार करतात. विशेष म्हणजे तिथे ऑनलाईन किंवा बायपोस्ट मतदान करू शकतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube