The Angry Birds Movie 3 : पॅरामाउंट पिक्चर्सने ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही 3’चा अधिकृत ट्रेलर, पोस्टर आणि ‘फर्स्ट लूक’ची फोटो सादर केली आहेत, ज्यातून या ब्लॉकबस्टर ॲनिमेटेड फ्रँचायझीच्या पुढील भागाची झलक पाहायला मिळते. हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेळी रेडसमोर केवळ ग्रीन पिग्सशी लढण्याचे आव्हान नसून, त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे वडीलपण (Fatherhood) आहे. कुटुंब आणि जबाबदाऱ्या सांभाळत जग वाचवण्याच्या मोहिमेवर निघालेल्या रेडचा नवा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या फ्रँचायझीची वैशिष्ट्यपूर्ण विनोदबुद्धी, भावनिक पैलू आणि जबरदस्त ॲक्शनने परिपूर्ण असलेला ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही ३’ एक नवीन कौटुंबिक पैलू सादर करतो, जो ‘रेड’ला एका अनोख्या परिस्थितीत घेऊन जातो. पालकत्वाच्या धावपळीत आणि गोंधळात मार्गक्रमण करत असतानाच, त्याला जगाला वाचवण्याच्या मोहिमेवरही जावे लागते. यातून हे सिद्ध होते की, युद्धभूमीवर नायक असणे जितके आव्हानात्मक असते, तितकेच घरी ‘नायक’ (किंवा जबाबदार पालक) असणेही कठीण असू शकते. या चित्रपटाची निर्मिती जॉन कोहेन, डॅन चुबा, कार्ला कॉनर आणि नमित मल्होत्रा यांनी केली असून, दिग्दर्शन जॉन राईस यांनी केले आहे. तर पटकथा थ्युरोप व्हॅन ऑर्मन यांनी लिहिली आहे.
लढा थांबणार नाही! नाशिक–पुणे रेल्वेसाठी 9 ऑगस्टला निर्णायक जनआंदोलन- आमदार सत्यजीत तांबे
या चित्रपटात जेसन सुडेकिस, जोश गॅड, एमा मायर्स, रॅचेल ब्लूम, वॉकर स्कोबेल, डॅनी मॅकब्राइड, मार्सेलो हर्नांडेझ, टिम रॉबिन्सन, ॲना कॅथकार्ट, मैत्रेयी रामकृष्णन, निक्की ग्लेझर, मिस्टरबीस्ट (MrBeast), सालिश मॅटर, साल्म वेस्ट, सॅम रिचर्डसन आणि जेम्स ऑस्टिन जॉन्सन, तसेच लिली जेम्स आणि केके पामर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे. पिसे, कुटुंब आणि भरपूर मज्जा-मस्तीसाठी सज्ज व्हा, कारण ‘द ॲंग्री बर्ड्स मूव्ही 3’ हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी भारतात इंग्रजी आणि हिंदी भाषेत केवळ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
