मोठी बातमी! ‘बिनविरोध’ निवडीला आव्हान देणारी मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे भाजपचे १४ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

News Photo   2026 01 14T153415.400

मोठी बातमी! 'बिनविरोध' निवडीला आव्हान देणारी मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीत अनेक जागांवर उमेदवारांची (Election) बिनविरोध निवड झाली. या प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांनाच सुनावलं आहे. जरी उमेदवार बिनविरोध निवडून आला असेल, तरी मतदारांसाठी ‘नोटा’ (NOTA) चा पर्याय उपलब्ध असावा, अशी मुख्य मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या विधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी झालेल्या सुनावणीत ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाल्यावर ही याचिका निवडणुकांशी संबंधित असल्याचं समोर आलं. या विसंगतीमुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारलं.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे भविष्य ठरणार; निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय?

न्यायालयान म्हटले की, तुम्ही सकाळी न्यायालयात चुकीची विधानं केली. रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत साम्य असल्याचं सांगितलं होतं. परंतु, त्यात कोणतंही साम्य आढळलं नाही. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागं तुमची कोणती घाई किंवा भीती होती? सुरुवातीला न्यायालयाने या चुकीच्या विधानाबद्दल दंड ठोठावण्याचे संकेत दिले होते, मात्र अखेरीस दंड न आकारता याचिका फेटाळून लावण्यात आली.

राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदानापूर्वीच ६६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठी बाजी मारली असून त्यांचे सर्वाधिक ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे १९ नगरसेवक बिनविरोध विजयी होऊन पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक वर्चस्व पाहायला मिळाले, जिथे भाजपचे १४ तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याव्यतिरिक्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार आणि मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.उमेदवारांच्या या बिनविरोध निवडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता या निवडीवर शिक्कामोर्तब झाले असून १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 

Exit mobile version