Former Mla Blackmailing case: नगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देत बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टीच्या एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग (Blackmailing case) करून त्याच्याकडून एक कोटी 25 हजार रुपयाची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एका महिलेसह कथित पत्रकार इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर याने ही धमकी दिली. (Ransom Case) तसंच, तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु व तुमचे राजकीय कारकिर्द संपवुन टाकु अशी धमकीही दिली होती. याबाबत माजी आमदाराने तक्रार दिल्यानंतर आता कोतवाली पोलिसांनी एका महिलेसह या कथित पत्रकाराला ताब्यात घेतलं आहे.
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेनंतर शिंदेंनी जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एक माजी आमदार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलंआहे की, तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे ती व्हायरल करायची नसेल तर एक कोटी 25000 रुपये द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी करून दोन महिलांसह एका युट्युब पोर्टल चालवणाऱ्या तथाकथित पत्रकाराने ब्लॅकमेलिंग केले होते.
ते पत्र नाहीच; ते फक्त एक पान; बावनकुळेंच्या स्पष्टोतीने पंकजांसह अनेकांचे टेन्शन वाढलं
सातत्याने होणारे या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर या माजी आमदारांनी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित पोर्टल वाल्याने फिर्यादी कडून 25 हजार रुपये देखील स्वीकारले होते. माजी आमदाराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारितेला काळीमा फासणारी घटना अहमदनगरमध्ये घडली. अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल व्हायरल करण्याची माजी आमदाराला धमकी. दोघांना अटक. माहिती देतना, प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस स्टेशन.#ahmednagar #extortioncase #kotwalipolice pic.twitter.com/oS2VZgr030
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 29, 2024