मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेनंतर शिंदेंनी जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना

  • Written By: Published:
मोठी बातमी : लाडकी बहीण योजनेनंतर शिंदेंनी जाहीर केली ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना

मुंबई : शिंदे सरकारने काल (दि.28) लाडकी बहीण योजनेसह शेतकरी, वारकरी आणि तरुणांसाठीही अनेक योजनांची घोषणा केली आहे. त्यानंतर आज (दि.29) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे. प्रताप सरनाईक यांनी एक तासापूर्वी सभागृहात मागणी केली होती. अवघ्या तासात मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे. (Maharashtra Monsoon Session CM Shinde Speech )

‘दादांचा वादा’, ‘फेक नरेटिव्ह’ अन् ‘विरोधकांचे चेहरे’; CM शिंदेंनीही केला हिशोब क्लिअर

प्रताप सरनाईकांनी काय केली होती मागणी?

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात केली होती. तसेच   सर्व आमदारांची परिस्थिती राम नाईक, प्रकाश सुर्वे यांच्यासारखी नसते असे म्हणत सरकारने गरिबांसाठी योजना आणण्याची मागणी केली होती. सरनाईक यांची ही मागणी झाल्यानंतर शिंदेंनी अवघ्या तासाभरात सभागृहात  ही मागणी मान्य करत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार आता राज्य सरकारच ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार आहे.

योजन कशी असणार?

मुख्यमंत्री म्हणाले की,मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी धोरण ठरवलं जाणार असून, शासनच्या माध्यमातून 5 हजार 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल. सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश असेल असे शिंदेंनी सभागृहात सांगितले. हज यात्रा तर आधीपासून सुरू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

“मी नमस्कारही केला नाही भेटणं सोडाच”; भेटीचं वृत्त फेटाळत बाजोरियांचं ठाकरेंना चॅलेंज!

अजितदादांचा वादा पक्का, थेट जीआरच दाखवला

काल (दि.28) अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी करताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सरकार खोटं बोलत असल्याचे विरोधक म्हणत होते. त्यावर अजितदादांचा वादा पक्क असतो असे म्हणत शिंदेंनी सभागृहात थेट शासन आदेशच दाखवला. तसेच युवकांना दहा हजार रुपये सरकार देणार आहे. आता हे पैसे डीबीटीने ज्यावेळी त्यांच्या खात्यात जातील तेव्हा तुम्हाला खरं वाटेल असे शिंदे म्हणाले.

ते पत्र नाहीच; ते फक्त एक पान; बावनकुळेंच्या स्पष्टोतीने पंकजांसह अनेकांचे टेन्शन वाढलं

मी कधीच खोटं बोलत नाही

मी कधीच खोटं बोलत नाही. मी सगळं उघड करतो. दोन वर्षांपूर्वी उघड केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवली. तुम्ही खोटं बोलून लोकांची मतं घेतली. पण आता फेक नरेटिव्ह चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. विरोधकांनी खरं ऐकण्याची सवय ठेवावी. अर्थसंकल्पात सर्वांचा विचार केला आहे. आता फेक नरेटिव्ह चालू शकत नाही. निवडणुकीत खोट्या गोष्टी पसरवल्या.  खोटं बोलून लोकांची मतं घेतली तरी देखील तुम्ही मोदींना रोखू शकला नाहीत. आता येथून पुढे फेक नरेटिव्ह चालणार नाही असा स्पष्ट मेसेज शिंदेंनी विरोधकांना दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube