Anil Parab : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना… अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
Anil Parab : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अध्यक्ष नार्वेकरांनी काल अचानक दिल्ली गाठली त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. यानंतर सुनावणी प्रक्रियेला वेग आला असला तरी विरोधकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. परब यांनी पत्रकार परिषदेत नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.
Rohit Pawar : अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
विधानसभेतील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल लागून ते अपात्र होतीलच. पण, आमच्या म्हणण्याप्रमाणे वरच्या सभागृहातले तीन आमदार सुद्धा अपात्र होणार आहेत. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दट्ट्या मारला, तेव्हा सुनावणी सुरू होते. अजून सुनावणी सुरू झालेली नाही. फक्त पहिल्या नोटीसा निघाल्या. काहीही कारणे देऊनन आम्हाला कागदपत्र मिळाली नाहीत असं सांगून वेळ मारून नेली, असा हल्लाबोल परब यांनी केला.
सुप्रीम कोर्टाने भूमिका स्पष्ट केली आहे. एका आठवड्याच्या आत सुनावणी घ्यायची आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे शेड्यूल द्यायचे आहे. त्यामुळे आता कुणाचीही सुटका होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निर्णय घ्यावाच लागणार आहे.
दिल्ली दौऱ्यात ठरवली नार्वेकरांनी रणनीती; आता ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची सुनावणी
विधानसभेप्रमाणेच विधानपरिषदेतही सत्ताधाऱ्यांची टंगळमंगळ सुरू होती. मी म्हटलं होतं की सभापती किंवा उपसभापती अपात्रता सुनावणी घेतात. पण उपसभातींवरच अपात्रतेची याचिका आहे. मग सुनावणी कोण घेणार, त्यामुळे याबाबत सरकार एखाद्या ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करील. पण, यावरही सरकारने काहीच कार्यवाही केली नाही. आश्वासन दिलं होतं पण सरकारने त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता शेवटी न्यायालय हाच एक पर्याय आमच्यासमोर राहतो, असे परब म्हणाले.
जे दुसरे दोन सदस्य आहेत. मनिषा कायंदे आणि विप्लव बाजोरिया. त्यांची याचिका सभापती ऐकतील. जोपर्यंत अपात्रतेवर निर्णय होत नाही तोपर्यंत त्या सभापती राहतील. त्यांना ऐकण्याचा अधिकार आहे असा निर्णय त्यावेळचे तालिका सभापती निरंजन डावखेरे यांनी दिला होता. आता या सर्व गोष्टींना आव्हान दिले जाणार असल्याचे ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले.