The kale-kolhe conflict flared up again in Kopargaon : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख नगरपालिका व नगरपरिषदांच्या लढतीमध्ये प्रामुख्याने कोपरगावच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. आता कोपरगाव मधूनच एक महत्त्वाची बातमी येत आहे. या ठिकाणी आज नगरपालिका व नगरपंचायत व नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडत असताना राष्ट्रवादी(Rashtrvadi Congress) व भाजपच्या(BJP) कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आहे. मतदान केंद्रावरच कार्यकर्ते भिडल्याने एकच गोंधळ उडाला, मात्र तातडीने प्रशासनाने मध्यस्थी करत हा वाद सोडवला.
न्यायालयीन प्रकरणामुळे निवडणूक स्थगित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतच्या अध्यक्ष व सदस्य आणि काही ठिकाणी केवळ सदस्य पदासाठी आज 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासा व पाथर्डी या चार ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान कोपरगाव मध्ये दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.
पुण्यात ऑपरेशन ‘लोटस’, आमदार पुत्र सुरेंद्र पठारे भाजपवासी, पण का? समजून घ्या राजकारण
नेमकं काय घडलं
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज कोपरगावात मतदान प्रक्रिया पार पडत असून यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट युतीमधीलच घटक पक्षांमध्ये सामना पाहायला मिळत आहे. मात्र मतदानापूर्वीच दोनही पक्षातील कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेरच एकमेकांशी भिडले. एका मतदान केंद्रामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपचे लोक मतदारांवर दबाव आणतायेत, की भाजपला मतदान करा असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान पोलीस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून हाकलून लावले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
नगरपरिषद अन् नगरपंचायतींसाठी मतदान; कुठं बोगस मतदार, तर कुठं मतदान यंत्रच ठप्प
काळे कोल्हे संघर्ष
कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे तर विवेक कोल्हे गटाकडून पराग संधान यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कुठेतरी काळे-कोल्हे संघर्ष पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळणार हे नक्की होते.
दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यापासूनच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टीकाटिप्पणी ही जोरदार पाहायला मिळाली. आज मतदानाच्या दिवशी सकाळीच एका मतदान केंद्रावर काळे व कोल्हे गट एकमेकांशी भिडले. प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे निकालापूर्वीच या ठिकाणचे राजकारण राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यकर्त्यांमध्ये देखील आता चांगला संघर्ष पाहायला मिळतोय.
