मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून भाजपने केलेल्या दाव्याला (Mumbai) शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट आव्हान देत, “या जन्मात तरी भाजपचा महापौर मुंबईत बसणार नाही,” असा थेट घणाघात केला. तसंच, मतचोरी, हापूस आंब्याचा वाद आणि मुख्यमंत्री दौऱ्यातील शिष्टाचार भंगावरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.
मुंबईत ठाकरेंच्या विचारांचाच मराठी माणूसच महापौर बनेल, तसंच भाजपचे नेते लोढा हे सर्व पक्ष चालवतात, या वक्तव्यावर बोलताना दानवे म्हणाले, “लोढा हे बिल्डर आहेत. त्यांना त्यांचे सर्व धंदे लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची चापलूसी करावी लागते असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर तपोवन वृक्षतोडीवरून भाजपचा ‘दुटप्पीपणा’ उघड झाला आहे असं ते म्हणाले.
… तर मुंबईत महापौर आमचाच होईल, भाजपला इशारा देत शिंदेंच्या नेत्याचा मोठा दावा
अयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरून दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली. “राम मंदिरावर जो पताका लावण्यात आला, त्यावर वृक्षाचे चित्र आहे, जो पर्यावरणाचा संदेश देतो. तपोवन हे श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र आहे. असं असताना पताका लावून आठ दिवस झाले आणि त्यांच्याच पक्षातील लोक या तपोवनातील पूर्ण वृक्षांचा नायनाट करण्यासाठी निघाले आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपचा दुटप्पीपणा यातून स्पष्ट होत असल्याचं सांगितलं.
हापूस आंबा कोकणाचा, रत्नागिरीचा आहे, हे जगाला सांगण्याची गरज नाही. हापूस आंबा महाराष्ट्राची नव्हे, देशाची शान आहे. असं असताना हापूस आंबा आता गुजरातचा, हे नवीन सुरू झाले आहे, असं म्हणत त्यांनी गुजरातच्या दाव्याला खोडून काढलं. तसंच, पालकमंत्र्यांचा शिष्टाचार भंगमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री गैरहजर असण्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “मुख्यमंत्री आल्यावर पालकमंत्री असलेच पाहिजे, हा शासकीय कार्यक्रम होता. शिष्टाचार हा फक्त पुस्तकात लिहिला आहे, त्याचं पालन होत नाही असंही ते म्हणाले.
