पावसाची प्रतीक्षा संपणार! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार कोसळणार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत.

News Photo   2026 08 25T090126.213

पावसाची प्रतीक्षा संपणार! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार कोसळणार

राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण (Rain) तयार झाले असून, कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. आज, 25 ऑगस्ट रोजी पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे. मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीला जोडून समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या प्रणालीपासून छत्तीसगड, झारखंड आणि उत्तर प्रदेशापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. त्याचबरोबर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही सक्रिय असून, तो अमृतसर, नजीबाबाद, शाहजहानपूर, वाराणसीमार्गे कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रापासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. सोमवार, 24 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या 24 तासांत गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे 87.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी राज्यात सोलापूर येथे सर्वाधिक 34.3 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी 17.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तसेच गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांतही काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तापमानाची विभागनिहाय स्थिती

पश्चिम महाराष्ट्र : किमान 17.7 ते कमाल 34.3 अंश सेल्सिअस

उत्तर महाराष्ट्र : किमान 19.4 ते कमाल 32 अंश सेल्सिअस

कोकण : किमान 24.6 ते कमाल 31.9 अंश सेल्सिअस

मराठवाडा : किमान 20 ते कमाल 33 अंश सेल्सिअस

विदर्भ : किमान 19.6 ते कमाल 33.3 अंश सेल्सिअस

तापमानाची ठिकाणनिहाय आकडेवारी

पुणे : किमान 22.5, कमाल 28.5 अंश सेल्सिअस

अहिल्यानगर : किमान 23.1, कमाल 31.2 अंश सेल्सिअस

धुळे : किमान 19.4, कमाल 32 अंश सेल्सिअस

जळगाव : किमान 23.6, कमाल 31.7 अंश सेल्सिअस

जेऊर : किमान 21.5, कमाल 33.5 अंश सेल्सिअस

कोल्हापूर : किमान 22.1, कमाल 25.6 अंश सेल्सिअस

महाबळेश्वर : किमान 17.7, कमाल 19.4 अंश सेल्सिअस

मालेगाव : किमान 22.4, कमाल 31.4 अंश सेल्सिअस

नाशिक : किमान 21.8, कमाल 29.1 अंश सेल्सिअस

निफाड : किमान 31.3, कमाल 30.5 अंश सेल्सिअस

सांगली : किमान 21.8, कमाल 26.9 अंश सेल्सिअस

सातारा : किमान 22.1, कमाल 27.2 अंश सेल्सिअस

सोलापूर : कमाल 34.3 अंश सेल्सिअस

सांताक्रूझ : किमान 25, कमाल 31.5 अंश सेल्सिअस

डहाणू : किमान 25.1, कमाल 31.9 अंश सेल्सिअस

रत्नागिरी : किमान 24.6, कमाल 30.5 अंश सेल्सिअस

छत्रपती संभाजीनगर : किमान 22, कमाल 29.8 अंश सेल्सिअस

धाराशिव : किमान 20, कमाल 30.7 अंश सेल्सिअस

परभणी : किमान 23, कमाल 33 अंश सेल्सिअस

परभणी कृषी : किमान 22.4, कमाल 31.2 अंश सेल्सिअस

अकोला : किमान 25.8, कमाल 33.3 अंश सेल्सिअस

अमरावती : किमान 24, कमाल 28.4 अंश सेल्सिअस

ब्रह्मपुरी : किमान 24.5, कमाल 26.8 अंश सेल्सिअस

बुलडाणा : किमान 23, कमाल 32.6 अंश सेल्सिअस

चंद्रपूर : किमान 24.6, कमाल 27.2 अंश सेल्सिअस

गडचिरोली : किमान 24.2, कमाल 26.2 अंश सेल्सिअस

गोंदिया : किमान 22.4, कमाल 29.4 अंश सेल्सिअस

नागपूर : किमान 23, कमाल 29.7 अंश सेल्सिअस

वर्धा : किमान 25.2, कमाल 28.5 अंश सेल्सिअस

वाशीम : किमान 21.4, कमाल 29.4 अंश सेल्सिअस

यवतमाळ : किमान 19.6, कमाल 28.4 अंश सेल्सिअस

येलो अलर्ट

जोरदार पावसाची शक्यता : पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गोंदिया आणि गडचिरोली.

विजांसह वादळी पावसाची शक्यता : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर.

विजांसह पावसाची शक्यता : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड आणि हिंगोली.

Exit mobile version