Download App

CM Eknath Shinde : केंद्र सरकारसाठी शिंदे सरकारचे 14 हजार झाडांच्या कत्तलीचे आदेश!

केंद्र सरकारच्या गॅस पाईपलाईनसाठी राज्यातल्या एकूण 14 हजार झाडांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्य बैठकीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने 14 हजार 241 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरीत दिलीय.

शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, वाघनखं परत देण्याचं ब्रिटनचं पत्र; मुनगंटीवारांची माहिती

केंद्र सरकारला गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या मंजुरी हवी आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने झाडांच्या कत्तली करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची ही गॅस पाईपलाईन बोर आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतील कॉरिडॉरमधून जाणार आहे.

Ahmednagar : नामांतराच्या घोषणेने निघाली जिल्हा विभाजनाच्या जखमेची खपली; दोन मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण…

नागपूरमधून मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत ही द्रवरुन नैसर्गिक वायू पाईपलाईनच्या माध्यमातून वाहून नेला जाणार आहे. एकूण 320 किलोमीटर अंतराच्या या पाईपलाईनपैकी 24 किलोमीटर क्षेत्राअंतर्गत वनक्षेत्र आहे.
याच 24 किलोमीटर वनक्षेत्रातील झाडांची कत्तल होणार आहे.

‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट

राज्य वन्यजीव मंडळाकडून 220 केव्हीची ठाणे सॅटेलाईट लाईन मंजूर केली आहे. जी ठाण्याच्या खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या आत 62 किलोमीटरमधून जाते. यासाठी 439 झाडे तोडण्यात येणार आहेत.

गोपीनाथ मुंडे असते तर मी आज… रासपचे नेते महादेव जानकरांचं मोठं विधान

राज्यातील बामणी गावापासून ते तेलंगणापर्यंत राष्ट्रीय महामार्ग 930 डी च्या रुंदीकरणासाठी ६ हजार ८०५ झाडे तोडली जाणार आहेत. ताडोबा-अंधारी-कन्हारगाव-इंद्रावत-कवळ या टायगर कॉरिडॉरमधून हा मार्ग जातो. तसेच ताडोबा-अंधारी-कवळ भागातील व्याघ्र कॉरिडॉरमधून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग 353 बी च्या रुंदीकरणासाठी 5,140 झाडे तोडली जाणार आहेत.

दरम्यान, या प्रकल्पांमुळे झाडे तोडण्यात य़ेणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात अद्याप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

Tags

follow us