गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात मान्सून आला आणि गायब झाला. अखेर आज राज्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून हवामान तज्ञ पंजाब डख यांचे हवामान अंदाज फेल जात होते. परंतु आता त्यांचा अंदाज खरा ठरला अजून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे
देशात आलेल्या चक्रीवादामुळे मान्सूनबाबतचे अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून तसेच हवामान तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात होते परंतु ते अंदाज फेल जात होते.(The prediction of Punjab Dakh came true, rains started in the state…)
परंतु गेल्या तीन – चार दिवसापूर्वी हवामान तज्ञ पंजाब डख यांनी राज्यात शनिवार 24 जून पासून पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे. आज 24 जून रोजी राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आज मुंबई – पुणेसह पाऊस कोसळू लागला आहे.
या पावसामुळे राज्यातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. डख यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पुढील 15 ते 20 दिवस भाग बदलत पाऊस पडणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनी किमान 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पंजाबराव डख यांनी अनेकदा पावसाविषयी अंदाज मांडले आहेत. मात्र त्यांचे हे अंदाज चूकीचे ठरल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे. कारण पंजाबराव डख यांचे हवामान अंदाज खरे ठरल्याचे अनेकदा शेतकरी सांगतात.
https://letsupp.com/maharashtra/renowned-industrialist-and-ceo-of-arjun-udyog-group-santosh-shinde-45-committed-suicide-along-with-his-wife-and-son-60694.html
पंजाब डख यांचे अगोदरचे अंदाज
मे महिन्यामध्ये 22, 23 आणि 24 मे रोजी मराठवाडा आणि तसेच राज्यातील बहुतांश भागात पाऊस होणार असा अंदाज डख यांनी व्यक्त केला होता.त्यानंतर डख यांनी 26 आणि 27 मे ला मान्सून सक्रिय होऊन राज्यात मान्सून 1 ते 3 जूनदरम्यान दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, शक्यतेनूसार मान्सून बरसला नसल्याचं दिसून आलं.
त्यानंतर 8 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर डख म्हणाले होते की, 8, 9 आणि 10 जूनला राज्यात मान्सूनचा पाऊस होणार आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी ठेवावी. असं देखील ते म्हणाले होते. मात्र त्यांच्या अंदाजाप्रमाणने पाऊस झाला नाही.