Maharashtra Rain : पावसाचा जोर वाढणार! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात ऑरेंज अलर्ट…

Maharashtra Rain : राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखावणारी बातमी समोर येत आहे. देशभरात आता मान्सूनचे आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. साधारणपणे संपूर्ण भारतात 4 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो मात्र, यावर्षी 4 जुलैआधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय. 2 Jul: पुढील 4,5 दिवस #कोकण व #मध्यमहाराष्ट्रात काही […]

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखावणारी बातमी समोर येत आहे. देशभरात आता मान्सूनचे आगमन झाल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. साधारणपणे संपूर्ण भारतात 4 जुलैपर्यंत मान्सून दाखल होत असतो मात्र, यावर्षी 4 जुलैआधीच संपूर्ण देशात मान्सूनचं आगमन झालं आहे. यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलीय.

गेल्या जून महिन्यात देशभरातील 16 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमी पाऊस झालाय, पण जुलै महिन्यात जोरदार पावसाचा तडाखा बसणार असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय. दक्षिण-पश्चिम मान्सून राजस्थान, पंजाब, हरयाणामध्ये पोहोचला आहे. तर उत्तर प्रदेशासह दक्षिण बिहार सोडून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये जुलै महिन्यात चांगलाच पावसाचा जोर असल्याचं आएमडीने स्पष्ट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भागांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह इतर भागांत पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या आहेत.

शिंदे सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी?

त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंट अलर्ट देण्यात आला असून सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुर, रत्नागिरी जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांत जोरदार पावसाची बॅटिंग होणार असल्याची शक्यता हवामान विभागाला आहे.

राज्यभरात मान्सूनच्या सुरुवातीलाच सर्वत्र पावसाचं आगमन झाल्याने उकाड्यामुळे होणाऱ्या त्रासापासून नागरिकांची अखेर सूटका झाल्याने दिलासा मिळाला आहे. तर मान्सून बरसल्याने राज्यात गारवी लाट पसरलीय.

Exit mobile version